घरफिचर्ससारांशतंत्रज्ञानाची काळी जादू : ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी!

तंत्रज्ञानाची काळी जादू : ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी!

Subscribe

‘टॅलेंट हंटिंग’साठी आतापासूनच परदेशी विद्यापीठांनी ‘स्ट्रॅटेजिक रेकी’ सुरू केली आहे. ‘अचूक टायमिंग’वर नेम धरून ‘गेम’ करण्याची तयारी झाली आहे. याची अनेक शिक्षण संस्थांना साधी भनकही नाही. ‘मिनिंगफूल’ लाईफसाठी भारतातदेखील टेक्नॉलॉजीचे वारे वाहू लागले आहे. अशावेळी आपलाच बदललेला चेहरामोहरा पाहण्यासाठी ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ समजून घेणे आवश्यक आहे. काय आहे ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी? हा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. खरंतर तंत्रज्ञानाच्या वापराची काळी बाजू ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी दाखविते. टीव्ही बंद केल्यानंतर किंवा झाल्यानंतर आपण आपलाच चेहरा आरशासारख्या दिसणार्‍या या काळ्या स्क्रिनवर पाहू लागतो. ‘आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी’ या उक्तीप्रमाणे तंत्रज्ञानाचे ‘बूमरँग’ झाले. तिथूनच जन्माला आली ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ संकल्पना!

– प्रा. किरणकुमार जोहरे

आपल्या प्रत्येकाला देदीप्यमान वाटणारा तरीही गर्दीत एकटेपणा भासवणारा ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चा काळाकुट्ट अंधारमय प्रवास सुरू झाला आहे. तोही अनेक कांगोरे व पैलूंसह! वास्तव जग, सत्य आणि आभासी जग यांच्यातील सीमारेषा लुप्त होत आहेत. संरक्षण दल आणि पोलीस यंत्रणा ज्या वेगाने अद्ययावत होत आहेत त्यांच्या कित्येक पट वेगाने रोज तंत्रज्ञान नवनवीन रूपडे घेत विकसित होत आहे. कालबाह्य पोपटपंची करणार्‍या महाविद्यालयातील ‘ज्ञानगुरूं’ना घरी बसविण्यासाठी सध्याची एडव्हान्सड टेक्नोलॉजीही कारणीभूत ठरत आहे.

- Advertisement -

सरकारच्या तिजोरीवरील भार यामुळे कमी होत आहे हे वास्तव न स्वीकारता जुन्या जीर्ण नोट्सवर आपल्या आयुष्याची नैया पार होईल अशी दिवास्वप्ने काही गुरुजींना पडत आहेत. आदरातिथ्य करणारे एआय बेस्ड एंकर कोबोट किफायतशीर ठरत आहेत. दुसरीकडे ‘टॅलेंट हंटिंग’साठी आतापासूनच परदेशी विद्यापीठांनी ‘स्ट्रॅटेजिक रेकी’ सुरू केली आहे. ‘अचूक टायमिंग’वर नेम धरून ‘गेम’ करण्याची तयारी झाली आहे. याची अनेक शिक्षण संस्थांना साधी भनकही नाही. ‘मिनिंगफूल’ लाईफसाठी भारतातदेखील टेक्नॉलॉजीचे वारे वाहू लागले आहे. अशावेळी आपलाच बदललेला चेहरामोहरा पाहण्यासाठी ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ समजून घेणे आवश्यक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) प्रतिभा व सृजनशीलता आज अशा प्रतिमा आणि व्हिडीओ बनवत आहेत, ज्यामुळे खरे आणि खोटे यातील भेद शोधणारे फॉरेन्सिक एक्स्पर्टदेखील आता चक्रावून जात आहेत. सध्याची उपलब्ध सिक्युरिटी सिस्टीम आणि डिफेन्स मॅकॅनिझम हा अद्ययावत टेक्नोलॉजीच्या पटलावर कालबाह्य ठरवत अक्षरशः मोडीत निघत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे जगाचा ताबा घेण्यासाठी पृथ्वीवरील १९३ अधिकृत देशांत एका क्षणात इंटरनेटच्या माध्यमातून घुसखोरी करीत सर्व काही उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य असलेल्या आणि अणुबॉम्बपेक्षा भयानक ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’बद्दल अनेक राज्यकर्ते अनभिज्ञ आहेत. परिणामी कायदे करणे आणि नंतर गुन्हेगारांना शिक्षा करणे यापेक्षा काय घडतेय आणि कसे घडतेय हे समजून घेणारी माणसे व ‘टेक्नोलॉजी वॉरियर्स’च थेट हायजॅक करीत पळविली जात आहेत हे दु:खदायी अथार्थ आहे.

आपल्या संस्थेत आपण किंमत केली नाही असे ‘ब्रेन’ पळविल्यानंतर संस्थांचे भव्यदिव्य आणि प्राणरहित परंतु भग्नावशेष, भकास सांगाडे हे नजीकच्या काळातील दृश्य वास्तव दिसू लागेल. तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे मोठमोठ्या चित्रपटगृहांवर बुलडोझर फिरविले गेलेत. नजीकच्या काळात शिक्षणसंस्थांवर अशी वेळ येणारच नाही याची गॅरंटी देणारा गुरू अज्ञातवासात असावा. जगभरातील शाळा-कॉलेजमध्येच नाही तर सरकारी कार्यालयेदेखील तंत्रज्ञानाच्या ‘व्हाईट मिरर’ने चकाकू लागले आहेत. अशावेळी पगार, पेन्शन, संप, आंदोलन, वशिलेबाजी, पक्षपात या सर्वांवर एका फटक्यात सायन्स व टेक्नोलॉजी हा रामबाण उपाय ठरला आहे. टेक्नोलॉजिकल वॉरियर्स हेच यापुढे असेट म्हणजे देशांची संपत्ती असेल हे जगातील सर्व ‘सरकारांना’ लक्षात आले आहे. परिणामी ‘ओन्ली सोलूशन्स’चे गीत गात नव्या सृष्टीचे सृजन करण्याचे मेंदू राष्ट्रांच्या सीमारेषा तोडत एकत्र येत आहेत, ते ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’शी मुकाबला करण्यासाठी!

ब्लॅक मिरर आणि ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी!

काय आहे ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी? हा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. खरंतर तंत्रज्ञानाच्या वापराची काळी बाजू ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी दाखविते. टीव्ही बंद केल्यानंतर किंवा झाल्यानंतर आपण आपलाच चेहरा आरशासारख्या दिसणार्‍या या काळ्या स्क्रिनवर पाहू लागतो. ‘आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी’ या उक्तीप्रमाणे तंत्रज्ञानाचे ‘बूमरँग’ झाले. तिथूनच जन्माला आली ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ संकल्पना!

‘एंथोलॉजी’ म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर विविध साहित्यिकांच्या व रचनाकारांच्या मन-मेंदूतून आकारलेल्या कलाकृतींच्या संपादनातून साकारलेली कलाकृती! खरंतर ‘ब्लॅक मिरर’ ही चार्ली ब्रूकरद्वारा बनवली गेलेली एक ब्रिटिश अँथोलॉजी टीव्ही मालिका होय. ‘ब्लॅक मिरर’चा पहिला एपिसोड ४ डिसेंबर २०११ रोजी ‘चॅनल ४’ या टेलिव्हिजन वाहिनीवरून प्रक्षेपित झाला. आतापर्यंत ६ श्रृंखलांमध्ये ४० ते ९० मिनिटे कालावधीचे सुमारे २७ एपिसोड बनलेत. ‘ब्लॅक मिरर’मध्ये लोकांना तंत्रज्ञानाची काळी जादू दिसली आहे. ‘ब्लॅक मिरर’ ही मालिका सामाजिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी थेट मनाला भिडणार्‍या आणि झोप उडविणार्‍या टेक्नोलॉजी आणि मीडिया वॉरच्या थीमचा ‘इम्पॅक्टफुल’ वापर आहे, तसेच नजीकच्या नखशिखांत बदलांच्या वादळाची झुळूकदेखील!

काय आहे ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’?
नजीकच्या भविष्यात रोबोट आणि कोबोट म्हणजे कोलॅबरेटिव्ह रोबोट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर), एग्युमेंटेड रियालिटी (एआर), नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग (एनएलपी), मेटाव्हर्स, इंटरनेट ऑफ बिहेवियर (आयओबी) आदी टेक्नोलॉजींचा खोलवर आणि अनप्रेडिक्टेबल परिणाम होणार आहे. टेक्नोलॉजीची काळी बाजू मानवजातीवर काय काय आपत्ती आणू शकते आणि याचा मुकाबला करण्यासाठी आपल्या ज्ञानसंस्थांचे खुजेपण अधोरेखित होत आहे. नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) असलेल्या मानवी मेंदूला कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) हॅक करणार्‍या ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’च्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृष्परिणाम रोखायचा नेमका कृती आराखडा बनवायचा कसा, हा गंभीर प्रश्न मानवी सभ्यतेपुढे उभा ठाकला आहे.

‘बायोट्रॉनिक्स’च्या मर्यादा!
मानवी शरीर हे एक बायोलॉजिकल मॅकॅनिझम आहे. मानवी शरीरात वाहणारी चेतना किंवा आत्मा हे दुसरे तिसरे काहीही नाही तर इलेक्ट्रॉनिक्सचे अनोखे रूप असलेला २० मिली एंपियरपर्यंतचा मुख्यत: डिसी म्हणजे डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट आहे. असे असले तरी मानवी जिवंत शरीर हे ‘बायोट्रॉनिक्स’च्या मर्यादांचे आगार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

इमोशन्स आर फुलिश थिंग्ज
खूप मतितार्थ दडलेले ‘इमोशन्स आर फुलिश थिंग्ज’ हे वाक्य स्टार ट्रेक मालिकेत आपण ऐकले असेल. मानवी मेंदूतील विविध क्षमतांचे भांडार किंवा खजाने ‘अनलॉक’ करण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या मानवी इमोशनल ड्रामाच्या पलीकडचा प्रवास सर्वच धर्मग्रंथांतून मानवी सभ्यतेला एक वेगळी दिशा खुणावताना दिसतो. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट, निगेटिव्ह गोष्टी मानवी मन लवकर आत्मसात करते. आपल्या प्रत्येकाला देदीप्यमान वाटणारा आणि तरीही गर्दीत एकटेपणा भासवणारा ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चा काळाकुट्ट अंधारमय प्रवासामागचे हेच खरे कारण आहे.

राजकीय समीकरणांचे भूकंप!
मानवी क्षमता वाढवण्यासाठी, इतरांशी सुसंवाद साधत जोडले जाण्यासाठी आणि आपले जीवन अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर ही चांगली बाजू आहे. असे असले तरी लोकांना कल्पनाच नाही की ब्लॅक मिरर टेक्नोलॉजीचा वापर बुद्धीभेद आणि दिशाभूल करण्यासाठी होत आहे. परिणामी देश व परदेशात अनेक राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.

‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’मुळे ‘टेक्नोलॉजी वॉरियर्स’ची ‘डिमांड’ जगभरात वाढली आहे. पूर्वग्रहाने मतप्रवाह निर्माण करण्यासाठी, भेदभाव, चारित्र्यहनन, असमानता निर्माण करणार्‍या कुरापती घडविणार्‍या बातम्या सोशल मीडियावर पेलण्यासाठी तसेच राजकीय मतप्रवाहांची अचानक दिशा बदलत सत्तांतरे घडवून आणण्यासाठी ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चा वापर वाट्टेल ती किंमत मोजून होत आहे. ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ ही अत्यंत धारदार आणि तरीही एक थेंबही रक्तपात न करता ‘कोलॅटरल डॅमेज’ करीत युद्ध जिंकण्यासाठीचा खराखुरा ‘गेम’ आहे.

मार्केटिंगसाठी ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी
आनंदाची नवीन ठिकाणे ‘एक्सप्लोर’ करीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी फॉर सेक्स, सेक्सोबोट आदी उत्पादने सामाजिक नीतीमत्ता आणि जुनी संस्कृती संपवून विवाहसंस्था मोडकळीस काढत नवी संस्कृती निर्माण करीत आहे.

घरी आल्यावर उगीच इतके पैसे गरज नसतानाही मी खर्च केले, असे वाक्य जर तुमच्या मुखातून बाहेर पडले असेल तर समजा की ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’च्या भुताची ही काळी जादू आहे.

मार्केटिंगसाठी ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चा वापर सर्वत्र वाढत आहे. तो रोखायचा कसा ही एक जागतिक डोकेदुखी ठरत आहे. फॅशन उद्योगातदेखील एआय अल्गोरिदमचा वापर ग्राहकांना आकर्षित करून त्यांना गरज नसतानाही खरेदी करण्यासाठी भाग पाडून त्यांचे खिसे रिकामे करण्यासाठी होत आहे. यासाठी कंपन्या खोर्‍याने पैसा सध्या खर्च करीत आहेत. जनसामान्यांच्या कल्पनेबाहेरचे हे जग आहे. मोबाईलवरून ऑनलाईन व मॉलमध्ये ऑफलाईन शॉपिंग करतानादेखील जाहिरातीद्वारे टार्गेट करण्यासाठी तुमची सर्व गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती एआय अल्गोरीदमने ‘लीक’ होत आहे ही चिंता निर्माण करणारी बाब आहे.

‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’चे वादळ सोशल मीडियाचा वापर व्यक्तींसाठी रेटिंग सिस्टीम, ओपीनियन पोल, लाईक-डिसलाईक आदी एक मानसशास्त्रीय आणि मनकवडे मायाजाल आहे. इंटरनेटला जोडलेला मोबाईल व लॅपटॉप डेटाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याची दोर ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’ला सोपवली आहे हे सत्य! आपल्या प्रत्येकावर सूक्ष्म कॅमेरे पाळत ठेवत आहेत आणि आपली संपूर्ण गोपनीयता आता उद्ध्वस्त झाली आहे. टेक्नोलॉजीचे व्यसन आपल्याला मुक्त होण्याची इच्छाही होणार नाही अशा प्रकारे जखडून टाकत आहे.

इंटरनेट ऑफ बिहेवियर
इंटरनेट ऑफ बिहेवियरमुळे (आयओबी) ब्लॅक मिरर टेक्नोलॉजीची शक्ती कित्येक पटीने वाढली आहे. इंटरनेट ऑफ बिहेवियर (आयओबी) हे असे विज्ञान आहे जे ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी’च्या भस्मासूराला सहाय्यक सेनापती ठरले आहे. परिणामी डेटा अ‍ॅनिलिसीस करताना समाजशास्त्र विषयातील तज्ज्ञांची मागणीदेखील वाढली आहे. तुम्ही कुठे किती वेळ पाहता याचा डेटा गोळा करीत तुमची बोलण्याची, वागण्याची प्रत्येक मूव्ह आज बुद्धिबळाच्या पटावरील खेळीप्रमाणे ठरविली जात आहे. कसे आणि अचानक काय घडले हे तुम्हालादेखील कळत नाही.

‘ब्लॅक मिरर’ समाजावर तंत्रज्ञानाचा नकारात्मक प्रभाव दर्शवते. ‘ब्लॅक मिरर’मधील भुते आणि भुताळणी आपणच आपल्या अंगावर ओढावून घेतली आहेत. टेक्नोलॉजीची खरीखुरी सायफाय आणि डिस्टोपिया म्हणजे भयपटाची झलक आपल्याला दिसते ती ‘ब्लॅक मिरर’ या आभासी मालिकेमधून!

वास्तव आणि आभास यांच्या घर्षणातूनच उडणार्‍या ठिणग्यांसह जन्माला आलेला नवा शब्द आणि खरेखुरे, गुप्त, विनाशकारी, जीवनव्यापक तंत्रज्ञान म्हणजे ‘ब्लॅक मिरर टेक्नोलॉजी.’

–(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -