घरफिचर्सअधिक मासाचे हे आहे नेमक शास्त्र

अधिक मासाचे हे आहे नेमक शास्त्र

Subscribe

आज पासून अधिक मास सुरू होत आहे. या वर्षी अश्विन महिना अधिक असल्या मुळे, सर्वपितृ अमावस्या नंतर सुरू होणारी नवरात्रोत्सव एक महिना पुढे गेली. अधिक महिना का येतो? त्याचे महत्व काय?

आपल्या शैक्षणिक पाठय पुस्तकात आपल्याला लीपवर्ष शिकवला जातो, पण मराठी महिन्यात अधिक मास का येतो, त्या मागे काय शास्त्र आहे हे शिकवले जात नाही. अधिक मास हा केवळ आपल्या देशातच येतो असे नाही आहे. जिथे जिथे चांद्रमास आधारित केलेंडर अस्तित्वात आहे तिथे हा अधिकमास थोडया अधिक वेगळ्या पद्धतीने येतो.

- Advertisement -

म्हणूनच आपण लीप वर्ष स्विकारतो …

पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असल्यामुळे सौर कालगणना महत्वाची ठरते. पण त्याचवेळी हेही खरे आहे की सूर्याच्या स्थानबदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवताना सूर्यामधले बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरता चंद्र उपयोगी ठरतो. हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते. या दोन्ही कॅलेंडर मध्ये कालगणनेत तफावत येऊ नये याकरता काही सुधारणा कराव्या लागतात. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी म्हणजेच ३६५ दिवस ५ तास ४८ मी ४३ सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे ‘लीप वर्ष’म्हणून स्वीकारतो.

पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे ‘चांद्रमास’. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास हा शुक्ल प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष हे २९.५ x १२ = ३५४ दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये याकरता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच ‘अधिक’ घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात.

- Advertisement -

अधिक मासाचे लॉजिक

पृथ्वीवरून पहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. म्हणजेच दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या रास बदलण्याला ‘सूर्यसंक्रांत’अथवा ‘सूर्य संक्रमण’असे म्हणतात. हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. यावरून हे लक्षात येते की चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून कधीतरी अशी स्थिती येते की एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला ‘असंक्रातीमास’ म्हणजेच ‘अधिक मास’म्हटले जाते. थोडक्यात काय तर सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

या राज्यात अधिक मास नसतो

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.

अधिक मास पुरूषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो

अधिक मासाचे आराध्य स्वामी भगवान श्री विष्णू मानले गेले आहेत. पुरुषोत्तम हे भगवान श्री विष्णूंचे एक नाव आहे. म्हणून अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणून देखील म्हटले जाते. याला मल लमास देखील म्हणतात. पुराणात या विषयाशी निगडित एक अतिशय रंजक गोष्ट आढळते. असे म्हटले जाते की भारतीय विद्वानांनी आपल्या गणना पद्धतीने प्रत्येक चंद्र महिन्यासाठी एक एक देव निश्चित केले आहेत. जरी अधिक महिना सूर्य आणि चन्द्र महिन्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी असला तरी ही या अतिरिक्त महिन्याचा अधिपती होण्यासाठी कोणीही देव तयार नव्हते अश्या परिस्थितीत ऋषी मुनींनी भगवान श्री विष्णूंना विनवणी केली की तेच स्वतः या महिन्याचे भार स्वतःवर घ्यावे. भगवान श्री विष्णूनी त्यांचा विनवणीला मान देऊन हे स्वीकारले आणि अश्या प्रकारे हा मलमासा प्रमाणेच पुरूषोत्तम मास देखील झाला.

इ.स.पूर्व ४३३ मध्ये मेटोनने सौरवर्ष आणि चांद्रमास यांचे गणिती नाते शोधूले. त्यानुसार १९ सौरवर्ष आणि २३५ चांद्रमास यांचे दिवस साधारण सारखे येतात. याचा वापर करून त्याने १९ वर्षांचे एक चक्र सुचवले, ज्यात १२ वर्षे १२ चांद्रमासांची तर उरलेली ७ वर्षे १३ चांद्रमासांची होती. १३ चांद्र्मासांची ७ वर्षे निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच या ७ वर्षांत अधिक महिना घेतला जात होता. ही पद्धत इ.स. पूर्व ४६ पर्यंत सुरू होती. ज्यू कॅलेंडरमध्ये आजही साधारण अशीच रचना आहे.

बुद्धिस्ट कॅलेंडर थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस, श्रीलंका या देशांत वापरले जाते. यामध्ये रचना थोडी वेगळी आहे. यातला पहिला चांद्रमास २९ त्यापुढचा ३०, आणि पुढे २९, ३० हा क्रम सुरू रहातो. अधिक मास घेताना एक अधिक दिवसही घेतला जातो. कोणत्या वर्षी अधिक मास घ्यायचा हे निश्चित असते. हा अधिक मास घेण्याची पद्धत पुर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. या खगोलीय घटनेवर माणसांचे नियंत्रण नसते. त्यामुळे या पद्धतीने अधिक मास घेताना चूक होण्याची शक्यता खूपच कमी होते. त्यामध्ये माणूस ढवळाढवळ करू शकत नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -