घरमहाराष्ट्रआनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंना भेटल्यावर त्यांच्या प्रश्नाने धक्काच बसला - मुख्यमंत्री...

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंना भेटल्यावर त्यांच्या प्रश्नाने धक्काच बसला – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. पण त्यातही एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला.

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर, वांद्रे येथील बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. पण त्यातही एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला.

हेही वाचा – वाघ तो वाघच, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून मनसेने केले राज ठाकरेंचे कौतुक

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण वाचून दाखवले. त्यांच्या या भाषणात एकसूरीपणा जाणवत होता. पण त्यांनी अचानक धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख करत, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला. 2001मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर मी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांनी मला सर्वप्रथम विचारले की आनंद दिघे यांची मालमत्ता किती आहे आणि कोणाकोणाच्या नावावर आहे, याची चौकशी त्यांनी केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

तुम्ही संघटना कशी उभी केली? त्यासाठी काय-काय केले? संघटना ठाण्यात आणखी कशा प्रकारे वाढविता येईल? असे प्रश्न ते विचारतील, अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांनी आनंद दिघे यांच्या मालमत्तेसंदर्भात माझ्याकडे विचारणा केल्याने मी हबकलोच. मला धक्का बसला. आजवर हे मी कोणालाच बोललो नव्हतो. खोटे बोलून सहानुभूती मिळवण्याचा माझा प्रयत्न नाही. हे मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. उलट आनंद दिघे यांचे साधे बँक अकाऊंटही नव्हते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – … होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात आनंद दिघे यांचा उल्लेख केला. गेली अनेक वर्षं शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात आनंद दिघे यांचा उल्लेख कधी केला गेला नव्हता. पण यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर आनंद दिघे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. आनंद दिघे यांना जाऊन 20 वर्षे झाली. पण आता एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे आठवत आहेत. कारण आता आनंद दिघे बोलायला नाहीत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यानिमित्ताने आनंद दिघे यांच्याबद्दलच्या आणखी काही गोष्टींचा उल्लेख आता दोन्ही गटांकडून केला जाईल, असा जाणकारांचा कयास आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -