घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार २० एप्रिल २०२४

राशीभविष्य : शनिवार २० एप्रिल २०२४

Subscribe

मेष – घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. अहंकारी होऊ नका. तुमचे मत सर्वांनी ऐकावे असे तुम्हाला वाटेल. आपुलकीने वागा.

वृषभ – घरातील गैरसमज दूर होईल. धंद्यात जम बसेल. संयमाने बोला. प्रवासात कायद्याचे पालन करा. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisement -

मिथुन – दिवस यशस्वी राहील. कठीण काम पूर्ण करू शकाल. स्पर्धा जिंकता येईल. नवीन ओळखी होतील. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

कर्क – धंद्यात वाढ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. वरिष्ठांची मदत उपयुक्त ठरेल.

- Advertisement -

सिंह – तडजोडीचे धोरण उपयुक्त ठरेल. घरात आनंदी वातावरण राहील. धंद्यात लक्ष घाला. व्यवहारात चोख राहा. नवे काम मिळेल.

कन्या – अपेक्षित असलेले काम मार्गी लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महत्त्वाची वस्तू सांभाळा. खर्च वाढेल.

तूळ – आजचे काम आजच करा. विचारांना चालना मिळेल. धंदा वाढेल. थकबाकी वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल.

वृश्चिक – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. मौज मजेत वेळ जाईल. पाहुणे येतील.

धनु – संततीबरोबर चर्चा करू शकाल. कुटुंबात आनंदी घटना घडेल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. प्रवासात नवीन परिचय होईल.

मकर – सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

कुंभ – धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. चांगल्या व्यक्तींचा सहवास मिळेल. कल्पनांना वाव मिळेल.

मीन – कोणाशीही वैर करू नका. कायद्याचे पालन करा. खिसापाकीट सांभाळा. कोर्ट केस सांभाळा. तब्येत उत्तम राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -