घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार ०५ मार्च २०२४

राशीभविष्य : मंगळवार ०५ मार्च २०२४

Subscribe

मेष : रेंगाळलेली कामे पटापट करून घ्या. मागील येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल. सामाजिक कार्यात सौम्य धोरण ठेवा.
वृषभ : सरकार दरबारची कामे होतील. आनंदी राहाल. धंदा वाढवण्यासाठी प्रयत्न यशस्वी होईल. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल.
मिथुन : दुपारनंतर कामातील अडचणी कमी होऊ शकतात. प्रवासात सावध राहा. कायद्याचे पालन करा. कोर्टकेस मार्गी लागेल.
कर्क : आजचे काम आजच करा. नको असलेली व्यक्ती संध्याकाळी भेटण्याची शक्यता आहे. घरातील खर्च वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.
सिंह : कर्जाच्या कामातील त्रुटी भरून काढता येईल. महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळवता येईल. कामातील वादावर पडदा टाका. रागावर ताबा ठेवा.
कन्या : सकाळी कामे करून घ्या. दुपारनंतर अडचणी येऊ शकतात. धंद्यात हिशोब नीट करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. वेळेला महत्त्व दिल्यास जास्त कामे होतील. मित्रांची मदत मिळेल.
वृश्चिक : घरातील महत्त्वाचा निर्णय घेता येईल. चर्चा यशस्वी होईल. शेअर्सचा अंदाज नीट घ्या. धंद्यात कामाचे योग्य नियोजन करा.
धनु : वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. सर्वांचे सहाय्य मिळू शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कार्य करत राहा.
मकर : तुमच्या मदतीने ज्यांना यश मिळाले असे लोक तुमचे आभार मानतील. नोकरीत मोठे आश्वासन मिळेल. धंदा वाढेल. यश मिळेल.
कुंभ : जिद्द कायम ठेवा. सकाळी क्षुल्लक कारणाने तणाव होऊ शकतो. प्रवासात अडथळे येतील. संकटातून मार्ग निघेल.
मीन : महत्त्वाचे काम सकाळीच करा. चहानंतर दिरंगाई होईल. धंद्यासाठी धावपळ करावी लागेल. कोर्टकेसमध्ये यशस्वी व्हाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -