घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्यः बुधवार २७ ऑक्टोबर २०२१

राशीभविष्यः बुधवार २७ ऑक्टोबर २०२१

Subscribe

मेष :- तुमच्या मनातील सल जवळच्या माणसाजवळ व्यक्त करता येईल. धंद्यासाठी मेहनत घ्या. यश मिळवता येईल.

वृषभ :- मन अस्थिर होईल. घरातील वाद कसा कमी होईल असा विचार कराल. धंद्यासाठी मदत घेता येईल.

- Advertisement -

मिथुन :- तुमच्या कामात किरकोळ अडचणी येतील. तुम्ही प्रयत्नांचा वेग कमी करू नका. अरेरावी करू नका.

कर्क :- आजचे काम रेंगाळत ठेऊ नका. महत्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. मैत्री वाढेल.

- Advertisement -

सिंह :- कोर्टाच्या कामात आशादायक परिस्थिती राहील. आपुलकीच्या व्यक्तींचा आधार महत्वाचा ठरेल.

कन्या :- कठीण काम करून घ्या. धंदा वाढेल. स्पर्धेत जिंकाल. दर्जेदार लोकांची मदत मिळेल.

तूळ :- तणाव होईल. काम करताना मन स्थिर ठेवा. रस्त्याने चालताना वाहनांकडे लक्ष द्या, विचार करू नका.

वृश्चिक :- जीवनसाथीची मर्जी राखता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. धंद्यात आळस करू नका.

धनु :- तुमच्या विचारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. दबाव राहील.

मकर :- आनंदी रहाल. घरात शुभ समाचाराने सर्वांना चकीत कराल. वाहन, घर खरेदीचा विचार कराल.

कुंभ :- विचारांना दिशा मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. नातलगांच्या भेटी होतील.

मीन :- धंद्यात मोठे काम मिळेल. जुना वाद मिटवता येईल. मागील येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -