राशीभविष्य: बुधवार,१२ जानेवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- आपसांतील वाद तुमच्याकडूनच मिटवले जातील. युक्तीच्या व शहाणपणाच्या गोष्टी तुम्ही सांगू शकाल.

वृषभ :- कठीण काम होईल. धंद्यात जम बसेल. अपेक्षित असलेली व्यक्ती भेटल्याने ताण कमी होईल.

मिथुन :- वरिष्ठांना खूश ठेवता येईल. घरातील वाटाघाटीत तुम्ही तटस्थ रहा. धंद्यात वाढ होईल.

कर्क :- मनाचा कोंडमारा होईल. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. सहनशीलता ठेवा.

सिंह :- आजचे काम वेगाने पूर्ण करण्याची तयारी ठेवा. उधार पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका.

कन्या :- जुन्या वादाला पडदा पडू शकेल. नव्याने कामास सुरुवात करा. लोकांच्या गरजेला उपयोगी पडा.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होऊ शकते. दुसर्‍याने शब्द मोडला, नम्रता सोडली तरी आपण तसे करू नये.

वृश्चिक :- धावपळ होईल. दुसर्‍याला मदत करण्यात स्वतःचे काम राहून जाईल. खर्च होईल.

धनु :- महत्त्वाचा निर्णय आजच घेता येईल. धंद्यात काम मिळवा. थकबाकी वसूल करा.

मकर :- आजचा तणाव उद्या कमी होईल. हे लक्षात ठेवा. क्षुल्लक वाद ताणू नका. संयम व श्रद्धा ठेवा.

कुंभ :- महत्त्वाची भेट आजच घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ करता येईल.

मीन :- जुने काम पुन्हा तुमच्याकडे येईल. वरिष्ठ तुम्हाला मानाने बोलावून घेतील. प्रेमाने वागा.