१६ जुलैपासून सूर्याच्या परिवर्तनामुळे ‘या’ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

ग्रहांचा राजा सूर्याचे १६ जुलैपासून राशीपरिवर्तन होणार आहे. या दिवशी सूर्य मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये मार्गक्रमण करणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तन रात्री ११ वाजून ११ मिनीटांनी होणार आहे. सूर्याचे हे राशीपरिवर्तन बऱ्यापैकी अनेक राशींसाठी महत्वाचे असणार आहे. तसेच मिथुन, कर्क, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन सर्वात उत्तम सिद्धा होणार आहे.

 • मेष
  मेष राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनामुळे सरकारी विभागात सफलता प्राप्त होईल. तसेच जे व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी तशी नोकरी मिळेल.
 • वृषभ
  वृषभ राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनामुळे नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता असू शकते. मात्र तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल.
 • मिथुन
  मिथुन राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.तसेच व्यापारात वाढ होण्याची शक्यता असू शकते.
 • कर्क
  कर्क राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनामुळे सरकारी कामात यश मिळेल, वैवाहिक आयुष्य उत्तम असेल.
 • सिंह
  सिंह राशीच्या व्यक्तींना या परिवर्तनामुळे प्रवास घडण्याचे योग बनत आहेत. मात्र हा प्रवास तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होणार नाही. शक्यतो प्रवास टाळा.
 • कन्या
  कन्या राशींच्या व्यक्तींना सरकारी विभागात सफलता प्राप्त होईल. तसेच जे व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी तशी नोकरी मिळेल.
 • तूळ
  तूळ राशीच्या व्यक्तींना नव्या सुरूवातीसाठी हा काळ अनुकूल राहील. तसेच या काळात तुम्हाला सफलता देखील प्राप्त होईल.
 • वृश्चिक
  वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. मात्र कुटुंबात पैश्यांच्या अडचणींमुळे वाद निर्माण होऊ शकतात.
 • धनू
  धनू राशींच्या लोकांना नोकरी, व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमधील सहकाऱ्यांपासून सावध रहा.
 • मकर
  मकर राशींच्या लोकांना राशी परिवर्तनामुळे सरकारी कामात यश मिळेल, वैवाहिक आयुष्य उत्तम असेल.
 • कुंभ
  कुंभ राशीच्या लोकांना या राशी परिवर्तनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण होऊ शकतो.
 • मीन
  मीन राशींच्या व्यक्तींसाठी ही वेळ उत्तम सिद्ध होईल. तसेच परिश्रम करणाऱ्यांना कामात यश मिळेल.