राशीभविष्य: सोमवार ३० मे २०२२, कसा आहे तुमचा आजचा दिवस?

do you know todays horoscope find out horoscope future

मेष : तुमच्या कार्याचे कौतुक होईल. धंद्यात वाद वाढवू नका. प्रेमाने संबंध जोडा, प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : जे मित्र असतात ते कधी कधी शत्रू होतात किंवा कधी त्याच्या उलट परिस्थिती होते. सावध रहा.

मिथुन : आप्तेष्ठांना मदत कराल. धंद्यात प्रगती होईल. घर, वाहन खरेदी-विक्रीचा विचार कराल.

कर्क : गुप्त कारवायांचा त्रास होऊ शकतो. संकट टाळता येईल. वरिष्ठांना दुखवू नका.

सिंह : मनावरचे ओझे वाहून न्यावे लागेल. मार्ग शोधता येईल. वरिष्ठांना दुखवू नका.

कन्या : रागाच्याभरात प्रश्न सोडवता येत नाही. गोड बोलून काम करून घेता येईल. सावध रहा.

तुला : तुमची महत्त्वाची कामे होतील. प्रतिमा उजळेल. नातलगांची भेट होईल. धंदा वाढेल.

वृश्चिक : वाटाघाटीत यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. कठीण काम करून घ्या.

धनु : विचारांना चालना मिळेल. शेजारी वाकड्यात गेले तरी तुम्हाला तडजोड करावी लागेल.

मकर : वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. हायबीपीचा त्रास होऊ शकतो. जवळचे मदत करतील.

कुंभ : तुमचा खंबीरपणा कौतुकास्पद ठरेल. जास्त स्पष्ट बोलणे स्वतःलाच त्रासदायक ठरू शकते.

मीन : महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. विरोधक कोण आहेत हे ओळखता येतील. ध्येय गाठा.