रविवार 28 ऑगस्ट ते शनिवार 3 सप्टेंबर 2022

rashi bhavisha

मेष : या सप्ताहात सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळेल. घेतलेले कष्ट फलद्रुप होतील. जुने येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात चांगली प्रगती होईल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. नव्या योजना बनवता येतील. घरातील तणाव कमी होईल. मुलांच्या प्रगतीची बातमी कळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नव्या ओळखी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. शुभ दि. २8, 30

वृषभ : या सप्ताहात सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र युती होत आहे. धंद्यात लवकर कामे मिळवा. जम बसेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा मिळेल. दौर्‍यात यश मिळेल. चांगले कार्य आत्ताच करून ठेवा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. संसारात आनंदाची बातमी कळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होईल. मैत्री वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. लवकर पेच प्रसंग मिटवा. कामात उत्तम कामगिरी कराल. विद्यार्थी वर्गाला मिळालेली संधी सोडू नये. प्रयत्न करावेत. शुभ दि. 29, 31

मिथुन : सिंह राशीत बुध प्रवेश या सप्ताहात होत आहे. सूर्य हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात क्षुल्लक अडचण येईल. त्यानंतर तुमच्या कामात वाढ होईल. आर्थिक व्यवहार होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. विचारांची देवाण-घेवाण करता येईल. विचारांना चालना मिळेल. घरगुती कामे होतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवे काम मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. काम यशस्वीपणे पूर्ण कराल. शिक्षणात मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ दि. २8, ३१

कर्क : सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवा फंडा धंद्यात फायदेशीर ठरेल. थकबाकी मिळवा. नोकरीत बदल करणे लाभदायक ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वाद-तणाव जास्त दिवस रेंगाळत ठेऊ नका. लोकांच्यासाठी चांगल्या योजना करा. कार्याचा उपयोग दुर्बळ कठीण जास्त होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन परिचय होईल. नवे काम मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शिक्षणात विशेष यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.
शुभ दि. २9, ३0

सिंह : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध प्रवेश, सूर्य हर्षल त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल. गुंतवणूक करणारे लोक समोरून विचारतील. थकबाकी वसूल करा. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. दौर्‍यात लोकप्रियता मिळेल. रागावर ताबा ठेवा. नोकरीतील तणाव कमी होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरातील वाद मिटवता येईल. मुलांच्या प्रगतीची बातमी कळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, लाभ मिळेल. परिचय वाढेल. कोर्टकेस आशादायक वाटेल.
शुभ दि. 28, 01

कन्या : या सप्ताहात सिंह राशीत बुध प्रवेश चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही काम केल्यास त्रास वाढेल. नोकरमाणसांना कमी समजून त्यांचा अवमान करून चालणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. मोठेपणाचा आव न आणता सर्वदूर कामे करा. त्यामुळे तुमचे स्थान स्थिर राहण्यास मदत होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड स्वीकारावी लागेल. घरात जवळच्या व्यक्तीच्या विषयी काळजी वाटेल. जबाबदारी वाढेल. कोर्टकेसमध्ये योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच बोला. कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासास घाई करू नका. शुभ दि. २9, 02

तूळ : सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल, सहकारी, नेते यांची मदत मिळेल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. घर, जमीन खरेदी-व्रिकीत फायदा होईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. नवे काम मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कामात यशस्वी व्हाल. शिक्षणात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. शुभ दि. 30, 03

वृश्चिक : सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र मंगळ युती होत आहे. धंदा वाढवता येईल. जुन्या ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी वसूल करा. क्षुल्लक घटना मनाविरुद्ध घडेल. जास्त त्याचा विचार करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक नम्रपणे तुमचे ऐकून घेतील. दौर्‍यात यश मिळेल. तुमच्या कार्यात ढवळाढवळ करणारे लोक समजून येतील. घरगुती कामे होतील. जीवनसाथी, मुले यांच्या सुखासाठी विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. ओळखी वाढतील. कोर्टकेस जिंकाल. काम पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गाला मोठे यश संपादन करता येईल. शुभ दि. 31, 01

धनु : सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील नुकसान भरून काढता येईल. प्रयत्नाने नवे काम मिळवा. ओळखीचा उपयोग करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात गैरसमज दूर करा. आरोप खोडून काढता येईल. वरिष्ठांची मदत मिळेल. नवे परिचय होतील. घरातील तणाव कमी होईल. वाटाघाटीत यश मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवे काम मिळेल. प्रसिद्धी होईल. कोर्टकेसच्या कामात सुधारणा होईल. आप्तेष्ठांच्या मदतीने स्वतःचे प्रश्न सोडवाल. शिक्षणात मागे राहू नका. शुभ दि. 02, 03

मकर : सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरु, त्रिकोण योग होत आहे. शनीच्या साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. धंद्यात तणाव होईल. रागावर ताबा ठेवा. छोट्या व्यक्तीला कधीच कमी समजू नका. नोकरीत कामाचा व्याप-ताप वाढेल. वरिष्ठांच्या बरोबर वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आरोप येईल. रागाच्या भरात कोणतेही कृत्य करू नका. कला-क्रीडा स्पर्धेत जास्त मेहनत घ्यावी लागेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या अधिपत्याखाली राहू नका. कामात बेसावध राहू नका. विद्यार्थी वर्गाने नम्र राहून चांगली संगत घ्यावी. शुभ दि. 01, 02

कुंभ : या सप्ताहात सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य हर्षल त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या कमी होतील. नवे काम मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून धंदा वाढवता येईल. मागील येणे वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. जनतेसाठी चांगले कार्य करता येईल. लोकप्रियता मिळेल. नोकरीत चांगला बदल करण्यासाठी प्रयत्न करा. संसारात आनंदाचे क्षण येतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. कोर्टकेसमध्ये अडचणीवर मात करावी लागेल. कामात धावपळ होईल, परंतु यश मिळेल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. 01, 03

मीन : या सप्ताहात सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीला नीट लक्ष द्या. फायदा होईल. नोकर माणसांच्या बरोबर सलोख्याने वागा. घरता जबाबदारी वाढेल. क्षुल्लक वाद वाढू शकतो. नम्रपणे रहा. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी निर्माण केल्या जातील. विरोध मोडून काढावा लागेल. कार्याचा प्रभाव मोठा असला की सर्व नीट रहाते. कला-क्रीडा स्पर्धेत जास्त अपेक्षा ठेऊ नका. थोरा-मोठ्यांशी ओळख होईल. आश्वासन मिळेल. कोर्टकेसच्या कामात नियमात राहून बोला. प्रवासाचा बेत आखाल. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणाने वागू नये. व्यसन करू नये. शुभ दि. २8, २9