Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य राशीभविष्य - रविवार २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८

राशीभविष्य – रविवार २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८

संपूर्ण आठवड्याचे राशिभविष्य

Related Story

- Advertisement -

रविवार २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८

मेष ः- कन्या राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. नोकरीत कामाची गर्दी होईल. नकळत तुमच्याकडून कामात चूक होऊ शकते. वरिष्ठांच्या बरोबर सावधपणे बोला. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही योजनेची व्यवस्थित मांडणी केली तरी सर्वांना मान्य होईल असे समजून चालणार नाही. विरोध सहन करावा लागेल. धंद्यात मोठी पैशांची उलाढाल नको. कामगारांचा अभाव जाणवेल. संसारातील किरकोळ समस्या सोडवता येईल. मुळचा प्रश्न कसा सोडवायचा असे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. कोर्टाच्या कामात, संशोधनाच्या कामात बुधवार, गुरुवार व्यत्यय येईल. कुणाची तरी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. शुभ दि. २९,३०

- Advertisement -

वृषभ ः- कन्या राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. क्षुल्लक वाटणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला मदत करू शकते हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी अधिकारी उपयोगी पडतात असे नाही. धंद्यात वाढ होऊ शकेल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक अडचणींवर मात करून काम करता येईल. शनिवारी फसगत होऊ शकते. कोर्टाच्या कामात आशादायक वातावरण राहील. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. रोख व्यवहार करताना सावध राहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधन कार्यात जिद्दीने यश खेचून आणावे लागेल. शुभ दि. ३१, १

मिथुन ः- कन्या राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात सुधारणा होऊन मोठे काम मिळेल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रगतिची मोठी संधी मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. दर्जेदार लोकांचा सहवास कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल. पुरस्कार, आर्थिक लाभ मिळेल. परदेशात नोकरी मिळवता येईल. कोर्ट केससंबंधी केस लवकर मिटवा. संशोधन कार्यात चांगले यश मिळेल. तुमचे वर्चस्व दिसेल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे प्रगति करता येईल. शुभ दि. ३०, ३१

- Advertisement -

कर्क ः- कन्या राशीत शुक्र प्रवेश, मंगळ, हर्षल केंद्रयोग होत आहे. सोमवार, मंगळवार धावपळ होईल. प्रवासात सावध राहा. प्रकृतिची काळजी घ्या. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील तणाव कमी होईल. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कार्याचे प्रतिनिधीत्व करावे लागेल. मोठ्या लोकांचे विचार जाणून घेता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या तडफदार वृत्तीचे दर्शन होईल. जीवनओळख उत्साहवर्धक ठरेल. कोर्ट केस-संशोधन कार्य यात यश मिळवता येईल. नियमांचे पालन करा. तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावयाचा आहे. शुभ दि. १, २

सिंह ः- कन्येत शुक्र प्रवेश, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात कटकटी होतील. संयमाने, हुशारीने प्रश्न सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या वक्तव्यावर टीका होईल. तुमची प्रतिष्ठा घालवल्याचा प्रयत्न होईल. तुमची योजना कात्रीत पकडण्याचा विचार वरिष्ठ करतील. नोकरीत गुप्तशत्रूंचा त्रास होईल. कोर्ट केसमध्ये बुधवार, गुरुवार चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. जुन्या कामाची आठवण करा. तुमचे डावपेच आठवा. तुम्हाला मार्ग शोधता येऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने चांगल्या संगतीची कास धरावी.
शुभ दि. ३०, ३१

कन्या ः- तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. ग्रहांची साथ असली तरी तुमचे मन अस्थिर राहील. त्यामुळे एखादा निर्णय चुकणार नाही याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त लक्ष देऊन योजना पूर्ण करण्याची तयारी ठेवा. धंद्यात काम घेऊन ठेवा. समस्या सोडवताना रागावर नियंत्रण ठेवा. कायदा मोडू नका. घरातील व्यक्तींचा गैरसमज दूर करता येईल. दगदग व धावपळ जास्त होईल. कोर्टाची तारीख पुढे टाकता येईल. संशोधन कार्यात अडचणी येतील. प्रतिष्ठा टिकवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद वाढवू नका. मैत्री टिकवा. शुभ दि १, २

तूळ ः- कन्येत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होण्यास सुरुवात होईल. पैसे सांभाळून ठेवा. प्रकृतिची बुधवार, गुरुवार काळजी घ्या. दगदग करावी लागेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. नोकरीचा प्रयत्न करा. विवाहासंबंधी चर्चा सफल होईल. संतती प्राप्तीचा योग घेता येईल. कोर्ट केससंबंधी कामात आशादायक परिस्थिती निर्माण होईल. संशोधन कार्यात पोलीस यंत्रणेला नवा मार्ग शोधता येईल. विद्यार्थी वर्गाने मनाची एकाग्रता केल्यास चांगले यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतिची संधी मिळेल. शुभ दि. २९, ३०

वृश्चिक ः कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात कठीण परिस्थितीवर उपाय शोधता येईल. प्रतिष्ठा सांभाळू शकाल. शुक्रवार, शनिवार आरोपांना उत्तर देणे कठीण होईल. धंद्यात लक्ष द्या. सप्ताहाच्या सुरुवातीला काम मिळवा. संसारातील समस्या कमी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत मेहनत, सहनशिलता ठेवावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकण्यापर्यंत जाता येईल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. चांगली संगत ठेवावी. संशोधन कार्यात मनाप्रमाणे काम होईल.
शुभ दि. १, २

धनु ः कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. संयमाने तुमचे विचार वरिष्ठांना सांगावे लागतील. प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा गुप्त शत्रू प्रयत्न करतील. मनाचे सामर्थ्य टिकून राहील. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. धावपळ होईल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. मजूर वर्गाला सांभाळणे कठिण होईल. डोळ्यांची काळजी घ्या. छोटेसे ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. कोर्ट केसमध्ये तणाव होईल. जिद्द ठेवा. यश खेचता येईल. संशोधन कामात कष्ट पडतील. कला-क्रीडा क्षेत्रात थोडक्यात यश हुकण्याची शक्यता आहे.
शुभ दि. २९, ३०

मकर ः- कन्येत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कार्याला मोठे यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. जनतेला खूश करता येईल. धंद्यात लक्ष द्या. व्यवहाराकडे लक्ष द्या. गुंतवणूक करणारे भागिदार मिळतील. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. घरातील लोकांची नाराजी दूर करू शकाल. प्रवासाचा आनंद घ्याल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. शत्रूला योग्य धडा देता येईल. संशोधन कार्यात प्रभावी उपाय शोधाल. वरिष्ठ कौतुक करतील. शुभ दि. १,२

कुंभ ः कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव येईल. तोफेच्या तोंडी तुम्हाला जावे लागेल. आरोप होतील. सावधपणे बोला. सावधपणे निर्णय घ्या. धंद्यात समस्या येईल. करार करण्याचा उतावळेपणा करू नका. गोड बोलून तुमचे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. वृद्ध, जवळच्या व्यक्तीची चिंता राहील. वाटाघाटीत तणाव होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. थोडक्यात पुरस्कार दूर पळत शकतो. संशोधन कार्यात तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळण्याची शक्यता आहे.
शुभ दि. ३०,३१

मीन ः कन्येत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात चिंताजनक घटना घडू शकते. मौल्यवान वस्तू सांभाळा. बुधवारपासून सर्वच ठिकाणी तुमच्या समस्या कमी होऊ शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. योजनांना प्रसिद्धी मिळेल. मैत्रीतील तणाव कमी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठी कलाटणी मिळू शकते. धंदा वाढेल. शेअर्समध्ये फायदा होईल. कोर्ट केसमध्ये आशादायक वातावरण राहील. संशोधन कार्यात मदत मिळेल. घर, जमिनी खरेदी-विक्रीत फायदा होऊ शकतो. शुभ दि. ३, ४

- Advertisement -