घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य: रविवार १९ मे ते शनिवार २५ मे २०१९

साप्ताहिक राशीभविष्य: रविवार १९ मे ते शनिवार २५ मे २०१९

Subscribe

मेष :- या सप्ताहात सूर्य बुध युति, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. व्यवसायात अधिक जम बसवता येईल. आळस करू नका. नोकरीतील समस्या कमी होईल. प्रभाव वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांना एकत्र करून नवा विचार त्यांचे समोर मांडता येईल. आत्मविश्वासाने डावपेच टाकता येतील. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक मतभेद होतील. संसारातील कामे होतील. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधनाच्या कामात प्रगती कराल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने योग्य दिशेनेच जावे. मेहनतीनेच यश मिळेल. शुभ दि. २६, २७

वृषभ :- सूर्य बुध युति, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. व्यवसायात वाढ करण्यात यश मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. वाद मिटेल. राजकीय-सामाजिक कार्यात वाटाघाटीत तडजोड करण्याची वेळ येऊ शकते; पण प्रतिष्ठा जाणार नाही. वरिष्ठ मदत करतील. घरातील ताण-तणाव राहील. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख होईल. परंतु त्यावर जास्त विश्वास ठेऊ नका. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या शेवटी अडचण येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने खरे बोलावे. व्यसन करू नये. शुभ दि. २७, २८

- Advertisement -

मिथुन :- चंद्र शुक्र त्रिकोण योग, चंद्र मंगळ प्रतियुती या सप्ताहात होत आहे. धंद्यात सावध रहा. हिशोब नीट करा. फसगत होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांना नाखूश करू नका. कायदा पाळा. प्रत्येक काम करण्यात अडथळे येऊ शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात तटस्थ भूमिका घ्यावी तरच निभाव लागेल. कोणतेही प्रखर मत व्यक्त केल्यास हल्लाबोल होईल. वाहनापासून धोका होऊ शकतो. घरातील व्यक्तीची मदत होईल. वृद्ध माणसांची चिंता वाटेल. संशोधनाच्या कामात समस्या येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडू शकते. विद्यार्थ्यांनी वाकडी वाट धरू नये. संकटात सापडाल. शुभ दि. २१,२२

कर्क :- या सप्ताहात सूर्य बुध युति, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात कामे मिळवा. थकबाकी वसूल करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. नवीन नोकरीचा प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर वाद होईल. वाटाघाटीत यश मिळेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई करू नका. गुप्त कारवायांवर मात करता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. घर, वाहन खरेदीचा विचार करता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाने परीक्षेत माघार घेऊ नये. यश मिळेल. शुभ दि. १९, २०

- Advertisement -

सिंह :- चंद्र बुध त्रिकोण योग, सूर्य बुध युती या सप्ताहात होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या मध्यावर होतील. नोकरीत वरिष्ठांची मदत घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. वाटाघाटीत मतभेद झाले तरी यश खेचता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. घरातील समस्या कमी होईल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने माघार घेऊ नये. ध्येय गाठावे. चांगली संगत ठेवल्यास नुकसान टाळता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २१, २२

कन्या :- चंद्र युती, सूर्य चंद्र त्रिकोणयोग या सप्ताहात होत आहे. महत्त्वाची कामे धंद्यातील असो वा इतर करून घेता येतील. मोठे कंत्राटी मिळवता येईल. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची गरज भासेल. प्रतिष्ठा मिळेल. घरातील लोकांच्यासाठी धावपळ करावी लागेल. किरकोळ गैरसमज होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मैत्रीत वाद संभवतो. संशोधनाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठ खूश होतील. तुमचा आत्मविश्वास कायम राहील. त्यामुळे कठीण काम करून घ्याल. विद्यार्थी वर्गाने चांगले मित्र निवडावे. व्यसनाने त्रास होईल. शुभ दि. १९, २०

तुला :- चंद्र गुरू युती, चंद्र शुक्र त्रिकोणयोग या सप्ताहात होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या डळमळीत करण्याचा प्रयत्न राजकीय-सामाजिक कार्यात होईल. संयम ठेवा. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत सावध रहा. धंद्यात काम मिळाले तरी अडचणी येतील. धंद्यात काम मिळाले तरी अडचणी येतील. हिशोब नीट करा. तुमचे बोलणे कठोर झाल्यास योग्य परिणाम होणार नाही. प्रतिष्ठा सर्वत्र सांभाळा. घरात प्रेमाची माणसे मदत करतील. कला-क्रीडा स्पर्धा वाढेल. संशोधनाच्या कामात तुमचा गोंधळ होईल. गुरुची आराधना करा. जिद्द ठेवा. गोड बोला. शुभ दि. २०, २१

वृश्चिक :- या सप्ताहात सूर्य बुध युती, चंद्र, शुक्र केंद्रयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना सावध रहा. घरगुती समस्या क्षुल्लक असेल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनासाठी खर्च होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वाटाघाटीत मित्रपण अडचणी वाढवतील. तुमचे मन खंबीर राहील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीतील समस्या कमी होईल. चांगला बदल करण्याची संधी मिळेल. संशोधनात प्रगती होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी ध्येय सोडू नये. चांगली संगत ठेवा. शुभ दि. २१, २२

धनु :- सूर्य चंद्र षडाष्टक योग, चंद्र शुक्र त्रिकोण योग या सप्ताहात होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी वाढतील. धंद्यात तणाव होईल. भागिदाराबरोबर मतभेद होऊ शकतो. प्रेमाने प्रश्न सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर संशय घेतला जाईल. प्रतिष्ठेवर टीका होईल. गुप्त शत्रू हल्लाबोला करण्याचा प्रयत्न करतील. राग वाढेल. कायदा कुठेही मोडू नका. कला-क्रीडा क्षेत्रात माघार घ्यावी लागेल. तुमचे कौतुक होईल. नोकरीत काम वाढेल. निर्णय घेताना चूक होईल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. घरगुती प्रश्न सोडवता येईल. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांचा अपमान करू नये. शुभ दि. २३, २४

मकर :- सूर्य बुध युति, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर विरोधक तुमच्यावर हल्लाबोल करतील. तुमचे वर्चस्व राजकीय-सामाजिक कार्यात वाढेल. जवळच्या लोकांना दुखवू नका. घरात खर्च वाढेल. धंद्यात सुधारणा करता येईल. त्याचा निर्णय लवकरच घ्या. नोकरीत बदल करता येईल. शेअर्स घेता येईल. फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. पुरस्कार मिळेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. जीवनसाथी, मुले यांच्यासाठी चांगला निर्णय घेता येईल. विद्यार्थी वर्गाने परीक्षा टाळू नये. शुभ दि. १९, २०

कुंभ :- चंद्र गुरु युती, चंद्र शुक्र त्रिकोण योग या सप्ताहात होत आहे. धंद्यात किरकोळ अडचणी येईल. कोर्ट केस संपवा. कामगार वर्गाकडून कटकटी होऊ शकतात. जागेसंबंधी समस्या येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व कमी मिळेल. तुमचा विचार पटण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी कोणताही निर्णय सावधपणे घ्या. सावधपणे बोला. जवळचे लोक सहाय्य करतील. कला-क्रीडा क्षेत्रात काटे की टक्कर घ्यावी लागेल. संशोधनाच्या कामात गोंधळ होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहूनच मत व्यक्त करा. विद्यार्थी वर्गाने चांगले धोरण सोडू नये. शुभ दि. १९, २०

मीन :- सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. सर्व अडचणींवर मात करू शकाल. बिघडलेले संबंध सुधारतील. नवी कल्पना सुचल्याने धंद्यात वाढ करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. थकबाकी वसूल होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. घर, जमीन, वाहन इ. खरेदी-विक्रीत फायदा होईल. कोर्ट केस संपवा. नोकरीत-फायदेशीर बदल करता येईल. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. शुभ दि. २०, २१

- Advertisment -