Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Subscribe

मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही.

हेही वाचा – आरक्षणाला धक्का लावणार नाही! देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

- Advertisement -

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या 2 हजार 950 जागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपा, काँग्रेसकडून महायुती तसेच महाविकास आघाडीच्या विजयाचे दावे करण्यात आले. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडून कोणताही दावा करण्यात आला नाही. त्यानंतर आज, दुसऱ्याच दिवशी (मंगळवारी) उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असताना जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

आजची बैठक ही कौटुंबिक स्वरूपाची होती. यात राजकीय विषयावर फार चर्चा झाली नाही. राजकीय बैठक नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण नव्हते, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – आली दिवाळी: पालिका मुख्यालयात भेट द्या; फराळ, वस्तू, मोदक, पुरणपोळी घ्या

सिल्व्हर ओकवर भेटींचा सिलसिला
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत आहेत. याआधी 12 सप्टेंबर रोजी सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. यावेळी खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यावेळी तब्बल दीड तास या चौघांमध्ये चर्चा झाली होती.

त्याआधी 11 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती, पण विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -