घरमहाराष्ट्र...तर भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावे, जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी आग्रही

…तर भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावे, जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी आग्रही

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्परतेने भूमिका घेत असतील तर अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी देखील कित्येक वर्षांपासून खोळंबलेला जातनिहाय जनगणनेचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडावा. हा प्रश्न मार्गी लागत नसेल तर भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलने केले आहे.

हेही वाचा – तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर…; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जातनिहाय जनगणनेसंबंधी आग्रही भूमिका मांडली. जोपर्यंत जातनिहाय जनगणना राज्यात होत नाही, तोपर्यंत संसदेत मांडलेले महिला विधेयक लागू होणार नाही, ओबीसी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार नाही, असे ते म्हणाले.

- Advertisement -

दिवंगत प्राध्यापक हरी नरके हे अनेक वर्षांपासून भुजबळ यांच्याबरोबर महाराष्ट्रात ओबीसींचा लढा लढले. अनेक परिषदा त्यांनी घेतल्या आणि या परिषदांमधून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे ओबीसी समाजाची फसवणूक केली आणि जातनिहाय जनगणनेचा भाग कसा लपवून ठेवला, या सर्व गोष्टींचा खुलासा नरके यांनी केला होता. पण, आज त्यांचेच सहकारी भुजबळ हे त्याच फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मी हरी नरके यांची माफी मागतो, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – दोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

भुजबळ यांना ओबीसी समाजाचा खरोखऱच पुळका असेल तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करावी. ओबीसींची जातनिहाय जनगणना जशी बिहारमध्ये झालेली आहे, त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात देखील व्हायला हवी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

…अन्यथा विधानभवनावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलतर्फे 10 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन जातनिहाय जनगणनेच्या मागणीचे निवेदन सादर करणार आहे. त्यानंतर पुढचे 15-20 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे शिष्टमंडळामार्फत निवेदन देऊन त्याची मागणी करणार आहोत, असे राज राजापूरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – टाइम आऊट प्रकरणाचा वाद Sportsmanship ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

तरीही ही मागणी मान्य झाली नाही तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव विधानभवनावर हल्लाबोल करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, दहशत माजवणे हे आमचे काम नाही. न्याय हक्काच्या दृष्टीने आरक्षण मागणे आणि त्या दृष्टीने चालणे हा ओबीसींचा धर्म आहे, त्या धर्माचे आम्ही पालन करणार. आम्ही कोणाचेही डोके फोडणार नाही, दंगे करणार नाही, समाज अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो आम्ही होऊ देणार नाही.

सुनील तटकरे यांना आव्हान
सुनील तटकरे यांनी 60व्या वाढदिवशी ‘समग्र’ हे पुस्तक प्रकाशित केले आणि या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी म्हटले होते की, माझ्या संपूर्ण कार्यकाळात शरद पवार यांनी विश्वास ठेवून राज्याचे मंत्री, नेता मला केले. जर तुम्ही क्षूद्र आहात तर, तुमच्या पुस्तकात लिहिलेले खोटे आहे का? असा सवाल राजापूरकर यांनी केला. सुनील तटकरे हे मुळात क्षूद्र नाहीत, ते कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावरती पाणी प्यायलेले नाहीत. ते प्यायले असतील तर, त्यांनी त्याचा एखादा फोटो ट्वीट करावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -