घरलाईफस्टाईलशिंगाड्याच्या पीठाचा हलवा

शिंगाड्याच्या पीठाचा हलवा

Subscribe

या दिवसात शिंगाड्याच्या पीठाला वाढती मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. असाच एक पदार्थ मुक्ताच्या वाचकांसाठी

सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. या १० दिवसात अनेकजण उपवास करतात. काही जण निर्जळी उपवास करतात तर काही जण फलाहार घेतात. या उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे यासारख्या पदार्थ्यांचे सेवन केले जाते. पण या दिवसात शिंगाड्याच्या पीठापासून बनविलेल्या पदार्थांचेसुद्धा सेवन केले जाते. त्यामुळे या दिवसात शिंगाड्याच्या पीठाला वाढती मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. असाच एक पदार्थ मुक्ताच्या वाचकांसाठी

शिंगाड्याच्या हलवा.jpg १२

- Advertisement -

साहित्य

१ वाटी शिंगाड्याचं पीठ, १ वाटी साखर, १ वाटी साजूक तूप, ३ वाट्या पाणी, वेलची पावडर, सुका मेवा

कृती

एका पॅनमध्ये थोडं साजूक तूप गरम करून त्यात सुका मेवा परतून घ्यावा. त्यानंतर सुका मेवा एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवावा. या तूपात थोडं आणखी तूप वाढवून शिंगाड्यात पीठ परतून घ्यावं. मंद आचेवर शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजून घ्यावे. या कृतीनंतर एका भांड्यात ३ वाट्या पाणी उकळत ठेवावं. यात साखर टाकून पाक तयार करून घ्यावा. शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजलं गेलं की त्यात साखरेचा पाक घालावा. मध्यम आचेवर दहा मिनिटे हे मिश्रण परतवून घ्यावं. त्यात तूपावर परतवलेला सूका मेका टाकावा आणि गरमागरम हा हलवा सर्व्ह करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -