घरताज्या घडामोडी'या' कारणांमुळे येतात वारंवार ढेकर

‘या’ कारणांमुळे येतात वारंवार ढेकर

Subscribe

अनेकांना जेवल्यानंतर ढेकर येत असतात. पण काही जणांना दिवसभरात अनेकदा ढेकर येत असतात. ज्यामुळे त्यांना इतर लोकांसमोर लाजिरवाणे होते. पण सतत ढेकर का येतात हे अनेक जणांचा ठाऊक नसेल. त्यामुळे आज आपण सतत ढेकर कशामुळे येतात हे जाणून घेणार आहोत.

अपचन होणे हे सतत ढेकर येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. कधी-कधी खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयीमुळे देखील ढेकर येऊ शकतात. बद्धकोष्ठतेचा त्रास देखील ढेकर येण्याचे मुख्य कारण असू शकते. यासाठी पहिल्यांदा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

कोल्डड्रींक्स, फुलकोबी, बीन्स, ब्रोकोली, तळकट, भाजके पदार्थ इत्यादी खाल्ल्याने पोटात गॅस तयार होतो. जे सतत ढेकर येण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे हे पदार्थ रात्री खाणे टाळावे. जेव्हा आपली गॅसमुळे पचन प्रणाली विस्कळीत होते, तेव्हा एच पायलोरी नावाच्या जिवाणूंमुळे पेप्टिक अल्सर किंवा गॅस्टिक अल्सराचा त्रास निर्माण होता. ज्यामुळे सातत्याने ढेकर येण्यासह पोट दुखी होते.

काही वेळा छोटी कारणे पोटात गॅस तयार होण्यास कारणीभूत ठरतात. जसे की ग्लासाला तोंड लावून पाणी पिण्याऐवजी वरून पिणे, जेवताना बोलणे, च्युईंगम खाणे इत्यादींमुळे पोटात गॅस होता. याला एरोफेस असे म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -