घरदेश-विदेशLok Sabha 2024 : एका मतासाठी 39 किलोमीटरची पायपीट; निवडणूक आयोगाचे खडतर...

Lok Sabha 2024 : एका मतासाठी 39 किलोमीटरची पायपीट; निवडणूक आयोगाचे खडतर काम

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, आणि देशभरात एकच लगबग सुरू झाली. त्यातही देशभरात सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि या निवडणुकांसोबतच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग देखील सज्ज होतो आहे. देशभरात सध्या मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. तर, देशातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू असतात. दरम्यान, चीनसीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील मालोगाम गावातील केवळ एका मतदारासाठी निवडणूक आयोगाला 39 किमीची पायपीट करावी लागते.

घनदाट जंगल, डोंगररांगा, बर्फाळ प्रदेश, नद्यांची मोठी पात्रे ओलांडून, तर दुर्गम भागात कित्येक किमी चालत, हत्ती, घोड्यावरून किंवा हेलिकॉप्टरने जाऊन तिथे मतदान केंद्रे स्थापन करतात. हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पितीमधील ताशीगैंग या 15, 256 फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी जगातील सर्वात ऊंच मतदान केंद्र स्थापन करण्यात येते. ताशीगैंग येथे केवळ 52 मतदार असून त्यांच्यासाठी ही सोय करण्यात येते. हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून 10 ते 12 हजार फूट उंचीवरील भागांमध्ये 65 मतदान केंद्रे आणि 12 हजार फुटांहून उंच ठिकाणी 20 मतदान केंद्रे तयार केली जातात. तर एखाद्या लहान बेटावरील लोकांना मतदान करता यावे म्हणून शिपिंग कंटेनरमध्ये मतदान केंद्र स्थापन केले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांतही अशीच व्यवस्था असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jayant Patil : ‘चारसौ पार’ची स्वप्ने पाहणाऱ्यांनी तरुणांची स्वप्ने चिरडून टाकली, जयंत पाटलांची टीका

मणिपूरमध्ये कशी व्यवस्था असणार

मणिपूरमध्ये नुकत्याच उफाळून आलेल्या संघर्षामुळे राज्यातील लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यांच्यासाठी निवारा छावण्यांजवळ 94 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या निवारा छावण्यांत 50 हजार मतदार आहेत. मेघालयमध्ये पश्चिम जैनतिया हिल्स जिल्ह्यातील कामसिंग गावात जाण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्याऱ्यांना लाइफ जॅकेट घालून सुरक्षा जवानांसह नदी ओलांडावी लागते. जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे गाव 69 किमी लांब आहे. या कामसिंग गावात केवळ 35 मतदार असून त्यात 20 पुरुष, 15 महिला आहेत.

- Advertisement -

एका मतासाठी 39 किमी.ची पायपीट

चीनसीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील मालोगाम गावातील केवळ एका मतदारासाठी निवडणूक आयोगाला ३९ किमीची पायपीट करावी लागते. ४४ वर्षीय सोकेला तयांग ही मालोगाममधील एकमेव महिला मतदार आहे. त्यांच्याशिवाय अन्य मतदाराची शेजारच्या मतदान केंद्रावर नोंदणी आहे. तयांग यांनी दुसऱ्या केंद्रावर नावनोंदणी करण्यास नकार दिल्याने ती गावातील एकमेव मतदार आहे.

तयांग या हुलियांग विधानसभा मतदारसंघ आणि पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी लिचेन कोयू म्हणाले की, हुलियांग ते मालोगाम असा पायी प्रवास करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो. मात्र, हा काही मुद्दा असू शकत नाही, कारण प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. ते पुढे म्हणाले की, एकच मतदार असला तरी मतदानाच्या दिवशी, निवडणूक टीमला सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बूथमध्ये राहावे लागू शकते. कारण मतदार मतदानासाठी कधी येईल, हे सांगता येत नाही.

हेही वाचा – Prakash Ambedkar : संजय राऊत किती खोटं बोलाल; आंबेडकरांकडून संताप व्यक्त

तायांगची मुले इथे राहत नाहीत. तायांग सांगते, “मी माझ्या गावात क्वचितच राहते. मी इथे काही कामासाठी किंवा निवडणुकीच्या वेळीच येते. एरवी मी लोहित जिल्ह्यातील वाक्रो येथे राहते, तिथे माझे शेत आहे.” गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मालोगाममधून दोन मतदार होते. दुसरा मतदार तायांग यांचे पती जेनालम तायांग होते. मात्र, जेनेलम तयांग यांनी नंतर त्यांचे नाव दुसऱ्या मतदार केंद्रावर हस्तांतरित केले. तिने सांगितले की, 18 एप्रिलला संध्याकाळी ती मतदानासाठी गावी पोहोचणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी देशभरात निकाल जाहीर होणार आहेत.

गीरच्या जंगलातही एक मतदार

गीरच्या घनदाट जंगलामध्ये बाणेज या भागात 2007 च्या लोकसभा निवडणुकांत मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तिथे महंत हरिदासजी उदासीन नावाचे पुजारी होते. त्यांच्यासाठी ही व्यवस्था करावी लागली होती. बानेज येथे केवळ एका मतदाराकरिता 20 कर्मचारी येथे यायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -