घरलाईफस्टाईलदररोज केळं खा आणि निरोगी रहा!

दररोज केळं खा आणि निरोगी रहा!

Subscribe

आपल्या शरिराला गरजेचे असणारे इन्सुलिन, हिमोग्लोबिन आणि आमिनो अॅसिड पुरवण्याचे कार्य हे फळ करते.

केळं हे सर्वांनाच परवडणारं असं स्वस्त फळ आहे. केळं हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. शरिरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन सी हे एका केळात असते. हे आपल्या शरिराला गरजेचे असणारे इन्सुलिन, हिमोग्लोबिन आणि आमिनो अॅसिड पुरवण्याचे कार्य करते.

- Advertisement -

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास

रोज दोन ते तीन केळं खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशिअमची आवश्यकता असते. हा घटक केळ्यात ४२० मिलीग्रॅम असल्याने रक्तवाहिन्याचे आरोग्य देखील उत्तम राखण्यास मदत करतं.

तणावापासून सुटका

केळात ट्रिप्टोफॅन असल्याने आपल्या शरिराला सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी सहाय्य करते. एका केळात साधारण २७ मिलीग्रॅम मॅग्नेशिअम असतं. केळातील या पोषक तत्व तणाव दूर करून मूड चांगला करण्यास तसेच झोप शांत लागण्यास मदत होते.

- Advertisement -

शरिरास ऊर्जा देण्यास मदत

केळात असणाऱ्या पोटॅशिअम या घटकामुळे स्नायू बळकट होण्यास लाभदायक ठरतं. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट शरिराला मुबलक ऊर्जा देण्यासाठी मदत करते.

पचनक्रिया उत्तम राखण्यास

केळ हे फळ पचनास हलकं असल्याने गॅस्ट्रो-इंटेस्टायनल ट्रॅक्टला त्रास होत नाही. यामध्ये असणाऱ्या प्रतिरोदी स्टार्च शरिरात पचत नाही तो मोठ्या आतड्यांमध्ये संपतो. हो शरिरास चांगल्या बॅक्टेरियाच्या रूपात काम करतो.

वजनावर नियंत्रण मिळवण्यास

केळात असणाऱ्या फायबर या घटकामुळे बराच वेळ भूक लागत नाही. केळामध्ये असणाऱ्या स्टार्च या घटकामुळे भूक कमी होतं आणि वजन न वाढता ते नियंत्रणात राहतं. यामुळे शऱिरातील साखऱेचं प्रमाण देखील योग्य राहते.

रक्त पेशी वाढण्यास मदत

केळात मुबलक प्रमाणात आयर्न असल्याने शरिरातील लाल रक्त पेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी मदत करते. केळात असणारे व्हिटॅमिन बी ६ साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे अनिमियाची लक्षणं दूर करण्यास केळं अत्यंत लाभदायक ठरतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -