घरलाईफस्टाईलब्रेकफास्ट : ब्राउन ब्रेड सँडविच

ब्रेकफास्ट : ब्राउन ब्रेड सँडविच

Subscribe

डाएट ब्राउन ब्रेड सँडविच

बऱ्याचदा डाएटवर आहे, असे सांगून काही खाता येत नाही. यामुळे आपल्याला आपली इच्छा मारावी लागते. मात्र, तुम्ही डाएटवर असताना देखील तुम्हाला हव्या त्या गोष्टी खाऊ शकता. त्यामुळे आज आपण डाएट ब्राउन ब्रेड सँडविच कस बनवायेच ते पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

ब्राउन ब्रेड स्लाईसेस – २
काकडी
टोमॅटो
सेलरीची पाने
चाट मसाला
उकड्लेले बीट
चटणी – पालक (चिरलेला वाटीभर), कोथिंबीर ४-५ काड्या, मिरची, लसूण, आलं (आवडत असेल तर), लिंबू रस, साखर, चिमुट्भर मीठ हे सगळं वाटून मस्त हिरवीगार चट्णी बनवावी.

कृती

- Advertisement -

ब्राउन ब्रेड स्लाईसला हिरवी चटणी लावून त्यानंतर त्यावर काकडी, टोमॅटो, उकड्लेले बीटच्या स्लाईसेस ठेवायचे. त्यावर चिमूट्भर चाट मसाला भुरभुरायचा, पाहिजे तर ग्रिल करा किंवा नुसतेच खा. हेल्दी आणि पोट्भर नाश्ता तयार. यामधे किंचित उकड्लेले मुगही टाकू शकता किंवा एखादा दिवस स्वतःचे लाड म्हणून उकडलेल्या बटाट्याच्या स्लाईसेस ही टाकू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -