घरताज्या घडामोडीझटपट तयार करा 'पापड पोटॅटो रोल'

झटपट तयार करा ‘पापड पोटॅटो रोल’

Subscribe

सध्या लॉकडाऊनच्या काळात बाहेरच खाण बंद असल्यामुळे अनेकांना चटपटीत खाण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे आज तुम्हाला एक चटपटीत रेसिपी सांगणार आहोत. पापड पोटॅटो रोल ची रेसिपी.

साहित्य

- Advertisement -

पापड, बटाटे, मैदा, बारीक चिरलेली मिरची, लाल मिरची पावडर, गरम मसाला, लिंबू रस, कोथिंबीर, तेल आणि चवीनुसार मीठ

 कृती

- Advertisement -

बटाटे पहिला उकडून साले काढून ते बारीक करा. एका भांड्यात मैदा आणि चार कप पाणी घालून मिक्स करा. बटाटे, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर दुसर्‍या भांड्यात घालून मिक्स करून घ्या. मग याचे लांब आणि सपाट करण्यासाठी हाताने रोल करा. पापड एका ताटात तुकडे करून ठेवा. कढईत तेल गरम करा. आता बटाटा रोल पिठाच्या मिश्रणामध्ये बुडवा आणि नंतर पापडच्या तुकड्यांवर रोल करा म्हणजे त्यात तुकडे चांगलेच चिकटून राहतील. गरम तेलात चांगले तळून होईपर्यंत ठेवा. नंतर हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -