घरलाईफस्टाईलदेसी साडीची क्रेझ

देसी साडीची क्रेझ

Subscribe

हॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकामावरून आपल्याला भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडते. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात.

हॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकामावरून आपल्याला भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडते. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात. या साड्या आपल्याला हव्या त्या डिझाईन्सने, रंगाच्या विणून घेऊ शकता, जसे की पाना-वेलींचे नक्षीकाम, वारली नक्षीकाम, किंवा आपल्याला हवे असेलेले नाव अशा अनेक डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

शिफॉन पॅटर्न 

सर्वात नाजूक आणि मोहक साड्यांच्या प्रकारामध्ये शिफॉन साड्या अग्रस्थानी आहेत. अनेक मुली शिफॉन पॅटर्न वजनाला हलके आणि विविध रंगांची सांगड या साड्यांमध्ये असल्या कारणाने मुली या साड्यांना पसंती देतात. शिफॉन साडी आणि त्यावर हलकासा मेकअप करणार्‍या मुली ऑफिस मध्ये खास आकर्षण ठरतात.

- Advertisement -

सिम्पली सिल्क

रेशमी साड्या या प्रत्येक वयोगटातील स्त्रीला उठून दिसतात. ऑफिसमध्ये अशीच सिल्क साडी कोणी नेसली तर त्या मुलीची हमखास कोण ना कोणीतरी तारीफ करतंच ! रेशमी साड्यातून स्त्रीचं सौंदर्य अधिकचं खुलतं. एखाद्या कॉर्पोरेट मिटिंगमध्ये आपण जर सिल्क साडी नेसून गेलो तर त्या साडीतही आपण प्रेझेंटेबल दिसू.

कुल कॉटर्न 

प्रत्येकाला आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहायला आवडतं. कॉटन हा ऑल टाइम बेस्ट मानला जाणारा पॅटर्न आहे. हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जातो. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वांपेक्षा कुल लूक देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साड्या हादेखील उत्तम पर्याय आहे.

- Advertisement -

लिनन ट्विस्ट 

लिनन पॅटर्न हा ऑफिस गोइंग मुलींसाठी सर्वात कंफर्टेबल असा ऑप्शन आहे. साध्या तागापासून बनवलेल्या या साड्या आपला ऑफिस लूक अधिक आकर्षक बनवतात. या साड्यांवर आपण वेगवेगळे डिझाईनर ब्लाऊज परिधान करण्याचे प्रयोगदेखील करू शकतो. कारण लिनन साडी असा पॅटर्न आहे, जे आपण कोणत्याही ओकेजनवर अगदी बिनधास्तपणे परिधान करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -