घरलाईफस्टाईलखुसखुशीत 'डाळवडे'

खुसखुशीत ‘डाळवडे’

Subscribe

जाणून घ्या खुसखुशीत 'डाळवडे' रेसिपी

बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास खुसखुशीत ‘डाळवडे’ नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -
  • एक वाटी चणा डाळ
  • दोन कांदे बारीक चिरलेले
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • एक चमचा लाल तिखट
  • चवीनुसार चिरलेली कोंथिबीर
  • चवीपुरतं मीठ
  • एक चमचा चाट मसाला
  • ओवा
  • तळण्यासाठी तेल

कृती

चणा डाळ ४-५ तास भिजत ठेवा. नंतर भिजवलेली डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात वरील सगळे साहित्य एकत्र करून एकजीव करुन घ्या. अखेर त्याचे छोटे-छोटे गोळे करून ते थोडे चपटे करा आणि तळून काढा. हे डाळवडे तुम्ही सॉस किंवा तिखट हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -