घरलाईफस्टाईलथंडीच्या दिवसात जपा तुमची नाजुक त्वचा

थंडीच्या दिवसात जपा तुमची नाजुक त्वचा

Subscribe

हिवाळा जरी हवाहवासा वाटणारा ऋतू असला तरी या थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. यासोबतच ओठ फुटणे, त्वचा काळी पडणे, टाचांना भेगा पडणे असे प्रकार थंडी सुरू झाल्यावर होत असतात. या थंडीच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जसे की, मॉइश्चराईझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे याकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. ज्याप्रमाणे थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण ऊबदार कपडे परिधान करतो. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील टिप्सचा वापर केल्यास थंडीत त्वचेला तजेला मिळण्यास नक्की मदत होईल.

* थंडीत त्वचा शुष्क आणि रुक्ष बनते. त्वचा कोरडी न राहता मऊ रहावी यासाठी दिवसातून दोनदा मॉइश्चराईझ क्रीम लावा.

- Advertisement -

* पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन घरच्या घरी मॉइश्चराईझ करणारा फेस पॅक तयार करा. या पॅकने ओल्या चेहर्‍यावर १५-२० मिनिटे मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवा.

* आपल्या चेहर्‍याची मृत आणि निस्तेज त्वचा काढून टाकण्यासाठी भरडलेले ओट्स, मध, साखर एकत्र करून ते मिश्रण ५-६ मिनिटे चेहर्‍यावर वर्तुळाकार चोळा. त्वचा चमकदार होते.

- Advertisement -

* थंडीत त्वचेला पोषण मिळावे यासाठी नारळाचा समावेश असलेल्या मॉइश्चराईझर क्रीमचा वापर करा किंवा खोबरेल तेलाचा वापर केला तरी त्वचा नैसर्गिकरित्या मृदू आणि तरुण राहते.

* कोरडी आणि सुरकुतलेली त्वचा घालवण्यासाठी मध, साखर आणि लिंबाचा रस या एकत्रित मिश्रणाने स्क्रब करा. जेणेकरून त्वचा मुलायम राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -