घरलाईफस्टाईलमान्सूनमध्ये आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करू नका!

मान्सूनमध्ये आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करू नका!

Subscribe

मान्सूनमध्ये आपल्या आरोग्यासह त्वचेकडे ही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते.

मान्सूनमध्ये समस्या नित्यनेमाने डोके वर काढत असतात. उदाहरणार्थ, या दिवसांमध्ये त्वचेला देखभालीची आणि जोपासनेची आत्यंतिक गरज असते. कितीतरी भ्रामक आणि चुकीच्या समजूतींमुळे आपण आपल्या त्वचेवर कितीतरी कठोर रसायने, डिटर्जंट्सचा मारा करत राहतो. तसेच अतीउत्साहाच्या भरात नको इतके स्क्रबिंग करतो. समवयस्कांच्या तज्ज्ञ सल्ल्यांनाआणि जाहिरातींतल्या दाव्यांना भुलून बाजारात उपलब्ध असलेली हजारो उत्पादने हवी तशी वापरतो. परंतु यामुळे त्वचेला हानी होण्याची शक्यता असते.

मान्सूनच्या दिवसांत हवा कोरडी आणि दमट असते. तसेच वातावरण ढगाळ असले तरीही सूर्याची हानीकारक UV – A आणि B किरणे त्वचेवर आघात करतच असतात. या मोसमात घाम तसेच सर्वसाधारण तेलकटपणाही वाढतो. म्हणूनच मान्सूनशी संबंधित त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी त्वचेच्या देखभालीसाठी सांगितलेली नित्यकर्मे करणे चांगले.

- Advertisement -

त्वचेचा प्रकार ओळखणे :

त्वचेचे तीन ढोबळ प्रकार आहे. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि मिश्र त्वचा. यातील प्रत्येक प्रकारच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे समजून घेऊ.

कोरड्यात्वेचेची देखभाल :

चांगली त्वचा, मॉइस्चराइज्ड किंवा आर्द्रता जपून ठेवणारी त्वचा. मान्सूनच्या दिवसांत अनेक अॅलर्जीज संभवतात आणि अॅलर्जिक त्वचा ही मूलत: कोरडी असते. अशा त्वचेला खाज आणि ओरखडे येऊ नयेत यासाठी तिला रोजच्या रोज मॉइस्चराइज करणे हा कळीचा उपाय आहे. आर्द्रता गमावून बसलेली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसते. मॉइस्चरायझर्सचे दोन प्रकार आहेत. इमोलिएन्ट (Emollient) प्रकारचे मॉइस्चरायझर त्वचेच्या सर्वात वरच्या स्तरावर पसरते आणि त्वचेवरील आर्द्रतेच्या कणांचे वातावरणात बाष्पीभवन होण्यापासून रोखते. तर ह्यूमेक्टंट (Humectant) प्रकारचे मॉइस्चरायझर त्वचेच्या बाह्य स्तरावरील पाण्याचे प्रमाण वाढवते. काही मॉइस्चरायझर्स त्वचेची हानी भरून काढणाऱ्या नैसर्गिंक मॉइस्चराइजिंग घटकांनी (Ceramides) समृद्ध असतात व ती अॅलर्जिक किंवा आजारी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या त्वचेसाठी कोणते मॉइस्चरायझर योग्य आहे हे शोधण्यामध्ये तुमचे डर्मिटोलॉजिस्ट तुमची मदत करू शकतात.

- Advertisement -

तेलकट त्वचेची देखभाल :

शरीरातील हार्मोन्स तैलग्रंथींच्या कामाचे नियमन करत असतात आणि मान्सूनच्या काळात ते अधिक सक्रिय होतात. यामुळे त्वचा चिकट दिसते; आणि तेलकट त्वचा असलेली माणसे चिकटपणा कमी करण्यासाठी त्वचेवर रोगणांचे थर लावतात तेव्हा त्याची परिणती अॅक्ने किंवा मुरुमांची समस्या उद्भवण्यामध्ये होते. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा दूर करण्यासाठी मेडिकेटेड फेस वॉशचा (दिवसातून दोनदा व तिनदा) रोज वापर करणे आवश्यक आहे. मात्र, चेहरा सारखा सारखा धुणे, स्क्रबिंग करणे मात्र टाळले पाहिजे. कारण त्यामुळे त्वचेतील तैलग्रंथींना अधिक तेल स्त्रवण्याचा संकेत मिळतो. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी पावसाळ्यात जाड मेक-अप करणे टाळायला हवे. त्याऐवजी त्यांनी वॉटर-बेस्ड कॉस्मेटिक्सचा वापर करायला हवा आणि त्वचा मॉइस्चराइज करण्यासाठी क्रीम्सच्या ऐवजी लोशन्सचा वापर करायला हवा. अॅक्नेचा वेळच्यावेळी बंदोबस्त करायला हवा. मात्र, हे करताना त्वचेवर डाग किंवा व्रण राहून जाऊ नये, यासाठी आधी डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा.

मिश्र त्वचेची देखभाल :

या प्रकारची त्वचा म्हणजे कोरडा बाह्यस्तर आणि तेलकट अंत:स्तर यांचे मिश्रण असते. अशा त्वचेला साजेशा उपचारांची गरज असते ज्यात सौम्य क्लेन्जर्स आणि चांगल्या प्रतीच्या मॉइस्चरायझर्सचा समावेश असायला हवा.

योग्य टोनर निवडा :

  • कोरडी त्वचा असलेल्यांनी अल्कोहोल फ्री टोनर्स वापरावेत.
  • तेलकट त्वचा असलेल्यांनी अल्कोहोल-बेस्ड टोनर वापरावेत.
  • मिश्र त्वचा असलेल्यांनी त्वचेवरील तेलकटपणा घालवण्यासाठी अल्कोहोल-बेस्ड टोनर तर त्वचेला खाज येत असल्यास नॉन-अल्कोहोल टोनर्स वापरावेत.

    डॉ. स्मृती नासवा सिंग; डर्मिटोलॉजिस्ट आणि कॉस्मेटिक डर्मिटोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -