घरक्रीडाआर्थर यांनी पाक संघाचे प्रशिक्षकपद सोडावे!

आर्थर यांनी पाक संघाचे प्रशिक्षकपद सोडावे!

Subscribe

अब्दुल कादिर यांचे विधान

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात सर्फराज अहमदच्या पाकिस्तान संघाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. त्यांनी या स्पर्धेतील सुरुवातीच्या ६ पैकी ३ सामने गमावले होते. ९ पैकी एकूण ६ सामनेच जिंकता आल्याने ते उपांत्य फेरीही गाठू शकले नाहीत. परंतु, असे असतानाही पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमने प्रशिक्षक मिकी आर्थर यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवावे असे म्हटले होते, पण पाकिस्तानचेच माजी फिरकीपटू अब्दुल कादिर अक्रमच्या मताशी सहमत नाहीत.

वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थर यांचा कार्यकाळ वाढवावा अशी मागणी केली असल्याचे मला ठाऊक आहे. मात्र, मी त्याच्याशी सहमत नाही. आर्थर यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवणे हा इतरांवर अन्याय ठरेल. इतर प्रशिक्षकांना या संघाला पुढे घेऊन जाण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. माझ्या मते आर्थर यांनी पाकिस्तान संघांमध्ये काहीही सुधारणा केलेली नाही. खरे सांगायचे तर सोहेल खान, कमरान अकमल, उमर अकमल यासारख्या खेळाडूंना डावलून पाकिस्तानचे नुकसानच केले आहे. हे खेळाडू अनुभवी असल्याने ते संघात असल्याचा पाकिस्तानला फायदा झाला असता, असे कादिर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -