घरलाईफस्टाईलबापरे! कमी 'चहा' पिणे आरोग्यास अपायकारक

बापरे! कमी ‘चहा’ पिणे आरोग्यास अपायकारक

Subscribe

चहाचे चौकीन असणाऱ्यांसाठीॉ आनंदाची बातमी आहे.

अनेक जण सांगतात की दुधाचा चहा पिणे सोडा. कारण दुधाच्या चहाचे सेवन केल्याने वजन वाढते. त्यासोबतच अपचनाचा त्रास देखील होतो. त्यामुळे चहाचे सेवन करु नये, असे वारंवार सांगितले जाते. पण, काही चहा चौकीन असतात, त्यांना चहा सोडणे शक्य नसते. अशाच चहाचे चौकीन असणाऱ्यांसाठी एक आनंदाचीबाब आहे. ती म्हणजे ज्या व्यक्ती चहाचे सेवन करतात त्यांचे आरोग्य उत्तम राहते. तर ज्या व्यक्ती चहाचे सेवन करत नाही त्यांच्या आरोग्यास धोका असतो.

एका इंग्रेजी वेबसाइटच्या वृत्तानुसार; युरोपीय जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, दररोज कमीत कमी एक कप तरी चहा पिणे गरजेचे आहे. कारण चहाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

- Advertisement -

१ लाख लोकांवर करण्यात आला प्रयोग

मिळालेल्या माहितीनुसार; हा प्रयोग चीनच्या तब्बल १ लाख लोकांवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार याचा सरासरी सात वर्षे पाठपुरावा करण्यात आला आहे.

एका आठवड्यात तीन कपपेक्षा कमी चहा पिणाऱ्यांना हृदय विकाराचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. तर तीन कप पेक्षा जास्त चहाचे सेवन करणाऱ्यांना हृदय विकाराचा धोका कमी असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ज्या व्यक्ती आठवड्याला तीन कप पेक्षा जास्त चहाचे सेवन करतात त्यांना २० टक्के हृद्यचा धोका असतो. तर ज्या व्यक्ती आठवड्यात तीन पेक्षा कमी चहा पितात त्यांना २२ टक्के हृद्यचा धोका असतो. तसेच या व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण देखील अधिक असते.

- Advertisement -

हार्वर्ड हेल्थच्या अभ्यासानुसार; ब्लॅक आणि ग्रीन टी (चहा) मध्ये फ्लेव्होनॉइड्सचा समावेश असतो. यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मत होते. तसेच हृद्यसंबंधित अनेक समस्या कमी होतात. तसेच रक्तप्रवाह देखील सुरळीत राहण्यास मदत होते.


हेही वाचा – वापरलेली चहा पावडर फेकून देण्यापूर्वी ‘हे’ वाचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -