घरक्रीडाSuresh Raina ची वैयक्तिक कारणासाठी IPL मधून माघार; पठाणकोटमध्ये नातेवाईकांवर हल्ल्याचं वृत्त!

Suresh Raina ची वैयक्तिक कारणासाठी IPL मधून माघार; पठाणकोटमध्ये नातेवाईकांवर हल्ल्याचं वृत्त!

Subscribe

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याने आता IPL मधून देखील माघार घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या IPL 2020 मध्ये देखील सुरेश रैना खेळताना दिसणार नाही. यासाठी रैनाने वैयक्तिक कारण दिलं आहे. मात्र, असं असलं, तरी त्याच्या पठाणकोटमध्ये राहात असलेल्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला झाला असून त्याच्या काकांचा यात मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसेच, त्याच्या आत्याचीही प्रकृती गंभीर असून त्याचे दोन चुलत भाऊ देखील या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर याच कारणासाठी रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. दरम्यान, रैनाने माघार घेतल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला हा अजून एक मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील CSK चे दोन खेळाडू Corona Positive सापडल्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर आणि कर्णधार MS Dhoni समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असतानाच आता सुरेश रैनासाठी दुसरा बदली खेळाडू शोधण्याचं मोठं आव्हान संघापुढे असणार आहे.

वृत्तामध्ये म्हटल्याप्रमाणे, सुरेश रैनाची आत्या अर्थात वडिलांची बहीण आपले पती आणि दोन मुलांसोबत पठाणकोटमध्ये राहतात. मात्र, शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांचे पती अशोक कुमार (५८) यांचा मृत्यू झाला असून आशा देवी या स्वत: गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच, सुरेश रैनाचे दोघे चुलत भाऊ देखील या हल्ल्यामध्ये किरकोळ जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळी Chennai Super Kings (CSK) चे सीईओ के एस विश्वनाथन यांनी सुरेश रैना वैयक्तिक कारणांसाठी भारतात परत आला असून IPL च्या यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नसेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांवर हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, सुरेश रैना परत आल्यामुळे सीएसकेसमोरच्या चिंता वाढल्या आहेत. याआधीच सीएसकेचे दोन खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील काही कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर रैनासारखा टीममधला महत्त्वाचा खेळाडू देखील उपलब्ध नसणं ही गतविजेत्या CSK साठी चिंतेची बाब ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -