घरलाईफस्टाईलBreakup नंतरही प्रियकरासोबत Patchup करायचंय? या टिप्स करा Follow

Breakup नंतरही प्रियकरासोबत Patchup करायचंय? या टिप्स करा Follow

Subscribe

ब्रेकअपनंतर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत पुन्हा आनंदाचे क्षण जगायचे आहे का?...

जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा संपूर्ण जग सुंदर दिसू लागते. परंतु प्रत्येक नात्यात प्रेम, भांडण आणि दुरावा असे होतच असते. काहीवेळा लहानशा वादामुळे नाते संबंध तुटू देखील शकतात. नातेसंबंधातील ब्रेकअपनंतर एकमेकांशिवाय जगणं बऱ्याचदा कठीण जाते. तसेच ब्रेकअपनंतर काही जणांना असेही वाटते की ते आपल्या जोडीदाराशिवाय जगू शकत नाहीत, मात्र कोणत्याही नात्यात चांगले-वाईट क्षण आल्याशिवाय ते नातं पुर्ण होत नाही.

जर तुमचं ब्रेकअप झालं असेल आणि तुम्हाला पुन्हा तुमच्या जोडीदारासह पॅचअप करायचं असेल तर, सर्वप्रथम आपल्या नातेसंबंधात का ब्रेकअप झाला याचा विचार करा. फक्त भावनेच्या भरात येऊन आपल्या नात्याचा शेवट करू नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासह पुन्हा पॅचअप करून तुमचं नातं आधी सारखं ठेवायचं आहे का? तुमचं खरंच त्याच्यावर प्रेम आहे का? की फक्त एकमेकांबद्दल फक्त अॅटरेक्शन होते? या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही पुन्हा तुमच्या जोडीदारासह पॅचअप करू शकतात.

- Advertisement -

जर तुमचं नुकताच ब्रेकअप झालं असेल तर साहजिकच तुम्ही दु:खी होणार हे नक्की.. परंतु घाई करून किंवा उतावळेपणाने पॅचअप करणे चांगले नाही. कारण कधीकधी नात्यातील अंतर देखील तुमचे नातं अधिक मजबुत होण्याचे कारण बनू शकते. मात्र अशावेळी जोडीदाराची तुम्हाला कमतरता जाणवते. तसेच अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ घेऊ द्या. कारण कोणत्याही नात्यातील संबंध तुटतात, तेव्हा नात्यात कडवटपणा येतो हे देखील खरं आहे.

ब्रेकअपनंतर बरेच लोक एकमेकांना सोशल मीडियावर ब्लॉक करतात. अशावेळी आपला मुद्दा जोडीदारापर्यंत पोहचवण्यासाठी एका चांगल्या मित्राची मदत घ्या, कारण एखादा मित्र ज्या प्रकारे तुम्हाला समजू शकतो. तसं कोणीही फारसं तुम्हाला समजवून घेऊ शकत नाही. परंतु अशा मित्रासह तुमच्या मनातील गोष्टी शेअर करा जो तुमच्या या समस्येस गंभीरपणे घेऊ शकेल.

- Advertisement -

अनेकदा असे होते की, ब्रेकअपनंतर लोक त्यांच्या जोडीदाराला वाईट बोलू लागतात आणि त्यांच्याबद्दल थेट सोशल मीडियावरही कित्येकदा व्यक्त होतात. जर तुम्हाला पुन्हा पॅचअप करायचा असेल किंवा नसेल परंतु आपण एखाद्याबरोबर बराच वेळ घालवत असू अशावेळी आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणं योग्य नाही. तर दुसरे म्हणजे त्यावेळी तुम्ही रागाने एखादं पाऊल उलतात पण नंतर त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चताप ही होतो. मात्र तोपर्यंत कदाचित वेळ हातातून जाऊ शकते. अशा तडकाफडकी निर्णयाने तुम्ही तुमच्या जोडीदारासह पुन्हा पॅचअप करण्याच्या संधी गमावू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -