घरताज्या घडामोडीकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ३३० नवे रुग्ण, आतापर्यंत ३०७ रुग्णांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ३३० नवे रुग्ण, आतापर्यंत ३०७ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ३३० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ३३० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ३०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

१२ हजार ३६५ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १२ हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असे आढळले नवे रुग्ण

  • कल्याण (पू) : ८६
  • कल्याण (प): ६७
  • डोंबिवली (पू) : ९९
  • डोंबिवली (प) : ४५
  • मांडा-टिटवाळा : ०९
  • मोहना : १६
  • पिसवली : ०८

सदर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी टाटा आमंत्रा येथून १२४ रुग्ण, वै. ह.भ.प. सावळाराम महाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून १६ रुग्ण, बाज. आर.आर. रुग्णालयातून १२ रुग्ण आणि हॉलीक्रॉस येथून २ रुग्णांनी कोरोनावप मात केली आहे. उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा – भारतीय रेल्वेत जगजीवन राम हॉस्पिटलने मारली बाजी; ७८ टक्के रिकव्हरी रेट!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -