घरलाईफस्टाईलपायाची नखे आणि मेलानोमा

पायाची नखे आणि मेलानोमा

Subscribe

तुमच्या पायाची नखे कापण्यापूर्वी जरा काळजीपूर्वक तपासा. नखे तपासण्यासाठी जाणारे साठ सेकंद कदाचित तुमचे आयुष्य वाचवू शकतील.या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते पायांच्या नखांची वेळोवेळी तपासणी केल्यास कातडीचा कर्करोग (स्किन कॅन्सर) झालेला असल्यास पटकन कळू शकतो व त्याच्यावर उपचारही करता येतील.

पायाचा मेलोनोमा झालेल्या व्यक्तींपैकी निम्म्या व्यक्ती पाच वर्षांत या रोगाने मरण पावतात. कारण अनेकांना आपल्याला अशा प्रकारचा कॅन्सर झाला आहे, हे कळेपर्यंत तो शरीरभर पसरलेला असतो. त्यामुळे तो उपचारांपलिकडे गेलेला असतो. जगात दरवर्षी मेलोनोमा रूग्ण स्कीन कॅन्सरने दरवर्षी मरतात. पण मेलोनोमा झाल्याचे लवकर समजल्यास टक्के लोक वाचण्याची शक्यता असते.

- Advertisement -

इतर कॅन्सरप्रमाणे मेलोनोमा प्रकारचा कॅन्सर कोणत्याही वयोगटाला होऊ शकतो. अगदी तरूण पिढीही त्यातून सुटू शकत नाही. त्यातही श्वेतवर्णियांना कृष्णवर्णीयांपेक्षा दहा टक्क्यांनी हा रोग होण्याची दाट शक्यता असते. वेळोवेळी पायांकडे जरा निरखून पाहिल्यास त्यावर एखादा डाग, तीळ असे काही संशयास्पद आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -