घरलाईफस्टाईलबाळाच्या नाजूक त्वचेसाठी

बाळाच्या नाजूक त्वचेसाठी

Subscribe

मोठ्यांच्या तुलनेत लहान बाळांची त्वचा नाजूक व संवेदनशील असते. बाळाच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्याला अनेक त्वचाविकार जडण्याची भीती असते. बाळाला अंघोळीसाठी वापरण्यात येणार्‍या साबणापासून ते मॉइश्चराइज, तेलापर्यंत सर्व गोष्टींची खात्री पटल्यानंतरच त्याचा वापर करावा.

बाळाचे स्नायू मजबूत आणि बळकट, तंदुरुस्त होण्यासाठी आंघोळीपूर्वी बाळाला मालिश करण्यात येते. पूर्वी खोबरेल तेल, राईचे तेल मालिशसाठी वापरण्यात येत असे. आता बाळाच्या मालिशसाठी बाजारात विविध ब्रँड्सचे ऑइल उपलब्ध आहेत. मात्र ब्रँडेड तेल वापरण्यापूर्वी डॉक्टर्सच्या सल्ला अवश्य घ्यावा. आठवड्यातील सातही दिवस बाळाला आंघोळ घालू नये. असे केल्याने बाळाची कोमल त्वचा रुक्ष होऊ शकते. बाळाला एक दिवसाआड आंघोळ घालावी. म्हणजे आठवड्यातून चार वेळा आंघोळ घालावी. तर उर्वरित तीन दिवस मऊ, तलमी कापडाने किंवा आंघोळीच्या स्पॉन्जने कोमट पाण्याने पुसून काढावे. बाळाच्या आंघोळीसाठी हल्ली बाजारात विविध ब्रँड्सचे तेल, साबण उपलब्ध आहेत. पण त्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर्सचा सल्ला अवश्य घ्यावा.

स्वच्छ आंघोळीनंतर वेळ येते बाळाच्या अंगाला मॉइश्चरायझर लावण्याची. बाळाची त्वचा लवकर कोरडी होते. त्यामुळे त्याच्या त्वचेला सतत हायड्रेट ठेवण्याची गरज असते. दिवसातून दोनदा बाळाला मॉइश्चरायझर किंवा मिल्क लोशन लावावे. खात्रीलायक मॉइश्चरायझर किंवा मिल्क लोशनची निवड करावी. आंघोळीनंतर बाळाला मुलायम, स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावे. बाळाचे कपडे मोठ्यांच्या कपड्यांसह धुवू नयेत. बाळांच्या कपड्यांसाठी सौम्य डिटर्जेन्ट्चा वापर करावा. वयस्क व्यक्तींच्या डिटर्जेंटमध्ये अतिशय हानिकारक केमिकल्स असतात, जे मुलांच्या कपड्यावर चिटकू शकता. यामुळे मुलांच्या त्वचेवर रॅशेज किंवा इरिटेशन होऊ शकते. वरीलप्रमाणे बाळाच्या त्वचेची काळजी घेतल्यास बाळाचे त्वचा विकारांपासून संरक्षण तर होतेच शिवाय बाळाला शांत झोप लागण्यास मदत देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -