घरलाईफस्टाईलहिमोग्लोबिन वाढवणारी फळे

हिमोग्लोबिन वाढवणारी फळे

Subscribe

या फळांचे सेवन केल्यास तुमचे हिमोग्लोबिन सहज वाढण्यास मदत होते.

बऱ्याचदा थकवा आला की डॉक्टर सांगतात हिमोग्लोबिन कमी झाले असणार. मग एकदा का चाचणी केली का ते वाढवण्यासाठी गोळ्या, औषध दिली जातात. परंतु तुम्ही घरच्या घरी काही फळांचे सेवन केल्यास तुमचे हिमोग्लोबिन सहज वाढण्यास मदत होते. त्यामुळे औषध किंवा गोळ्या खाण्याची आवश्यकता नाही.

सफरचंद

सफरचंद हे असे फळ आहे जे बाराही महिने सहज उपलब्ध होते. त्यामुळे दिवसाकाठी एक सफरचंद खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते.

- Advertisement -

लीची

लीची हे फळ आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. लीचीमध्ये बीटा कॅरोटीन, राईबोफ्लेबिन, नियासीन आणि फॉलिक acid किंवा बी जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तपेशी वाढतात. तसेच पचनही सुलभ होते. तसेच लाल रक्तपेशींच्या वाढीसाठी ही जीवनसत्त्वे शरीरास मिळणे अत्यावश्यक असतात.

डाळिंब

डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसह प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते.

- Advertisement -

बीट

बीटामध्ये फॉलिक acid मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बीटाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -