घरलाईफस्टाईलस्टोल द्वारे मिळवा डॅशिंग लूक

स्टोल द्वारे मिळवा डॅशिंग लूक

Subscribe

स्टोल म्हणजे एक असा कपडा, ज्याचा वापर स्कार्फ आणि ओढणी म्हणून केला जातो.महिलांप्रमाणेच पुरुष देखील स्टोलचा वापर करताना दिसतात.अर्थआच याचे प्रमाण अत्याल्प असले तरी ,बाजारात पुरुषांसाठीसुद्धा खास स्टोल्स उपलब्ध आहेत.बहुतांश महिला स्टोल मानेभोवती गुंडाळतात. तर पुरुष स्कार्फ सारखा वापर करतात.स्लोलचा कपडा हा मफलरपेक्षा हलका आणि ओढणीपेक्षा थोडा जाडसर कपड्याचा असतो. स्लोलचा वापर संपूर्ण वर्षभर करता येतो.

*पुरुषांमध्ये वापरण्यात येणारे स्टोल्स हे युनिसेक्स रंगाच्या फॅब्रिकमध्ये येतात.

- Advertisement -

*हे फॉर्म आणि कॅज्युअल दोन्ही कपड्यांबरोबर घालता येतात.

*फॉर्मल वेअरबरोबर गाठ बांधून हे घालता येतात.

- Advertisement -

*घालतांना एकतर तो छातीपर्यंत असावा किंवा कोटाच्या उंचीएवढा असावा.

*स्टोल तुमच्या ब्लेझरपेक्षा जास्त लांब नसावा.

*गडद रंगाचा स्टोल फॉर्मल रंगाच्या कपड्यांवर मॅच होतो.

*प्लेन आणि चेकच्या पॅटर्नवर काळा, पांढरा, ग्रे, नेव्ही ब्लू स्टोल फॉर्मल वेअरच्या श्रेणीमध्ये येतात.

*कॅज्युअल वेअरमध्ये स्टोलचा पॅटर्न आणि बांधण्याची पद्धती, यामध्ये वेग-वेगळे पर्योग करता येतात.

पश्मिना स्टोल
*हा स्टोल अश्या व्यक्तींना आवडतो ज्यांची टेस्ट रिच आहे. हे स्टोल अत्यंत मुलायम आणि महागडे असतात.

*हल्ली पश्मिना स्टोल्सवर सिक्वेल्स मोतीचे वर्क आणि एंबोलिशमेंटही असते. हे स्टोल मॉडर्न कॅज्युअल, फॉर्मल प्रत्येक प्रकारच्या कपड्यांची शान वाढवतात.

जामवार स्टोल
*हा स्टोल उत्तम कलाकुसर आणि उत्तम रंगसंगतीच्या फॅब्रिकचा नमुना आहे. हा स्टोल त्याच्या हाय क्लास लूकमळे प्रसिद्ध आहे.
*जामवार स्टोल हे त्याच्यावरील कलीकुसरीमुळे दोन्ही बाजूने परिधान करता येतात.
*हे स्टोल अत्ंयत नाजूक आणि उबदार असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -