घरलाईफस्टाईलपायाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

पायाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

अशी दूर करा पायाची दुर्गंधी

बऱ्याचदा पायांत बूट घातल्यावर तसेच इतर कारणांमुळे पायाला दुर्गंधी येते. मात्र, ही दुर्गंधी घरच्या उपयांनी दूर कशी करायची याविषयी आपण पाहणार आहोत.

चहापावडर आणि पाणी

- Advertisement -

एक टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये चहापावडर किंवा टी – बॅब टाकावी. त्यानंतर अर्धा ते एक तास त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. त्यानंतर पाय बाहेर काढून कोरडे करावेत आणि त्यावर मॉश्यराझर लावावे. यामुळे पाण्याची दुर्गंधी सहज दूर होते.

साबण

- Advertisement -

पायाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पाय नियमित साबणाने धुवावेत. यासाठी अँटीबॅक्टेरिया गुणधर्म असलेला साबण वापरावा. यामुळे पायावरील विषाणू आणि अन्य जंतू नष्ट होतात आणि पायाची दुर्गंधीसुद्धा नाहीशी होते.

पाय स्वच्छ ठेवावे

पायांची योग्य निगा राखावी. तसेच ते खराब होऊ नयेत, याची काळजी घ्यावी. त्यामुळे पाय नेहमी स्वच्छ धुवावेत.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामधील सोडियम कार्बोनेट पायांची दुर्गंधी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते. घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीला यामुळे काही प्रमाणात अटकाव निर्माण होतो. कोमट पाण्यात सोडा घालून त्यामध्ये अर्धा तासापर्यंत पाय ठेवल्यास पायाची दुर्गंधी दूर होते.

अद्रक

अद्रक पाण्यात अर्धा तास उकळून घ्या. या पाण्यामध्ये अर्धी बादली थंड पाणी टाका. अर्धा तास या पाण्यात पाय बुडवून ठेवा. पाय मऊ होऊन पायाची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -