घरलाईफस्टाईलतूप खाऊन वर्षभरात त्याने कमी केले ४० किलो वजन!

तूप खाऊन वर्षभरात त्याने कमी केले ४० किलो वजन!

Subscribe

तेलकट व तुपाचा अतिवापर जेवणात केल्यामुळे लठ्ठपणा येतो, असे मत सर्रास ऐकायला मिळते. परंतु, एका तरुणाने वर्षभरात ४० किलो वजन कमी केले, तेही जेवणात तुपाचा वापर करून! त्यामुळे हा तरुण सध्या सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरला आहे. वर्षभरापूर्वी त्याचे वजन १२० किलो होते, आता त्याने वजन ८० किलो इतके कमी केले आहे.
२९ वर्षीय हेमंत राव हा एक व्यावसायिक आहे. उत्तराखंड येथील नाग टिबा येथे ट्रेक करायला जाण्याची त्याची इच्छा होती. परंतु, वजन आणि लठ्ठपणा यामुळे त्याला नाग टिबा येथे ट्रेकला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे हेमंतने वजन कमी करायचे ठरवले. व्यायाम आणि जेवणात तुपाचा वापर वाढवल्याने त्याला वजन कमी करणे शक्य झाल्याचे हेमंत सांगतो.

नाव : हेमंत राव
व्ययसाय : व्ययसायिक
वय: २९
वजन (पूर्वी): १२० किलो
वजन (आता) : ८०
कालावधी : १ वर्ष
टर्निंग पॉईंट : नाग टिबा हा सोपा ट्रेक मी वाढलेल्या वजनामुळे करू शकलो नाही, याचं खूप वाईट वाटलं. मी फ्रस्ट्रेट झालो. आता आपण वजन कमी करायला हवं, असा मला वाटलं.

- Advertisement -

नाश्ता : एक चमचा व्हे प्रोटीन आणि ब्लॅक कॉफी. व्यायामानंतरचे जेवण: एक चमचा तुपात तयार केलेलं चार ते पाच अंड्यांचं ऑम्लेट. पालेभाज्या त्यामध्ये माश्यांच्या तेलाचे तीन थेंब व त्यानंतर मल्टी व्हिटॅमिन टॅब्लेट.

दुपारचे जेवण : एक चमचा तुपात तयार केलेले १०० ते २०० ग्रॅम पनीर हिरव्या पालेभाज्यांसह.

- Advertisement -

रात्रीचे जेवण : चिकन बिर्याणी ( यामध्ये एक चमचा तूप, ५० ते २०० ग्रॅम तांदूळ आणि ३०० ग्रॅम बोनलेस चिकन)
डाएटदरम्यान मसाला वापरलेले पदार्थ खाऊ नका, असे अनेक फिटनेसप्रेमी सांगतात. परंतु, हेमंत बिर्याणी तयार करताना त्यामध्ये मसाले वापरतो.

हेमंतने ४० किलो वजन घटवून स्वतः लोकांसाठी एक चांगले उदाहरण ठेवले आहे. परंतु, त्याने वर्षभरात एकदाही त्याच्या डाएट सोबत चीटिंग केली नाही, हेदेखील तो आवर्जून सांगतो. जेवणात तुपाचा वापर केल्याने फॅट वाढते हा समज हेमंतने खोडून काढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -