घरलाईफस्टाईलHealth Tips : ऊन लागल्यास काय कराल? वाचा या टिप्स

Health Tips : ऊन लागल्यास काय कराल? वाचा या टिप्स

Subscribe

उन्हाळ्याचे घातक परिणाम भोगावे लागू नये म्हणून तुम्हाला त्यासाठी आधिक काळजी घ्यायला सुरवात केली पाहिजे. या काळात कोणते आजार आणि विकार उद्भवू शकतात आणि कशाकशाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आधीच उपाय सुरू करायला हवे.

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार संभवतात. यात प्रामुख्याने त्वचाविकार, उष्माघात यांसारख्या अनेक आजारांचा समावेश होतो. शिवाय उन्हाचा त्रास लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच होतो. अशा उन्हाळ्याचे घातक परिणाम भोगावे लागू नये म्हणून तुम्हाला त्यासाठी आधिक काळजी घ्यायला सुरवात केली पाहिजे. या काळात कोणते आजार आणि विकार उद्भवू शकतात आणि कशाकशाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आधीच उपाय सुरू करायला हवे.

हे करा उपाय
१.भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर ठरेल.

- Advertisement -

२.कैरीचं पन्हे प्या
कैरीचं पन्हं पिणे उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीरात गारवा टिकून राहतो.

३. घरा बाहेर जाणं टाळा
उन्हाळ्यात जास्त उन्हात घरा बाहेर जाणं शक्यतो टाळा. किंवा बाहेर जाताना डोक्यावर स्कार्फ घ्या. जेणेकरून ऊन्हाचा त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात होणार नाही.

- Advertisement -

४. त्वचेची काळजी घ्या
उन्हाळ्यात घराबाहेर जाण्याआधी चेहऱ्याला सनस्क्रिन लावा, यामुळे तुम्हाला सनबर्नची समस्येचा सामना करावा लागणार नाही.

५. रसाळ फळांचे सेवन करा
उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज, द्राक्षे यांसारख्या फळांचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी एनर्जी मिळेल.

६. जेवणामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन करा
कांदा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेला पूर्ण करतो. कांदा खाण्यामुळे तुमच्या शरीरातील सायनस आणि टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. कांद्यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

 

 

Health Tips : जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे ‘हे’ आहेत साइड इफेक्ट्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -