घरलाईफस्टाईलHealth Tips : जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे 'हे' आहेत साइड इफेक्ट्स

Health Tips : जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे ‘हे’ आहेत साइड इफेक्ट्स

Subscribe

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, हे गोड फळ अतिप्रमाणात खाल्याने त्याचे गंभीर पण दिसून न येणाऱ्या साइड इफेक्ट्सचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

फळांचा राजा आंबा त्याच्या गोड चवीमुळे अनेकांचे आवडते फळ आहे. उन्हाळा आला की अनेकजण आंब्याचा आस्वाद घेण्याची तयारी करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का?  आंबा स्वताःबरोबर असे काही साइड इफेक्ट्स घेऊन येतो, जे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, हे गोड फळ अतिप्रमाणात खाल्याने त्याच्या गंभीर पण दिसून न येणाऱ्या साइड इफेक्ट्सच सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

आंबा अतिप्रमाणात खाल्ल्याने उद्भवू शकतात या समस्या

- Advertisement -

१. अॅलर्जी
जास्त प्रमाणात आंबे खाल्याने काहीजणांना अॅलर्जी  होऊ शकते. आंब्यामधील प्रोटीन लेटेक्य सारखे असते. ज्यांना आधीपासून लेटेक्स अॅलर्जीची समस्या आहे. त्यांना आंब्याचे अतिसेवन महागात पडू शकते.

- Advertisement -

२.मधुमेहाचा त्रास
आंब्यामध्ये नैसर्गिक रित्या जास्त प्रमाणात गोडपणा असतो. ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. ज्या लोकांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी आंबे खाणं टाळावे.

३.अतिसार
आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अधिक प्रमाणात आंबा खाल्ल्यास पचन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो.

४.वजन वाढणे
तुम्ही आंबे अतिरिक्त प्रमाणात खात असाल तर यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु ठराविक प्रमाणात आंबे खाल्ल्यास तुमचे वजन वाढणार नाही. पण आंब्याचे सेवन वाढल्यास पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

५. मुरूमांचा त्रास
आंब्यामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते आंब्याच्या सेवनाचे प्रमाण वाढल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. दिवसभरात एक आंबा खाणे शरीरासाठी योग्य ठरेल. पण आंब्यांचे जास्त सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढेल आणि चेहऱ्यावर मुरुम येतील.

 

Health Tips : ‘हे’ पदार्थ वारंवार गरम केल्यास होतात विषारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -