घरलाईफस्टाईलहार्ट फेल्युअर

हार्ट फेल्युअर

Subscribe

हृदयाशी संबंधित आजार म्हटले तर लो.बी.पी., हाय बी.पी., किंवा हार्ट अटॅक बद्दल जास्तीत-जास्त लोकांना माहिती असते. हार्ट फेल्युअर हा सुद्धा हृदयाचा एक आजार असून याविषयी फार कमी लोकांना माहिती असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

सहा विविध देशांच्या अभ्यासानंतर हार्ट फेल्युअरमुळे होणारा मृत्यूदर २३ टक्केे असल्याचा खुलासा हार्ट फेल्युअर इंटरनॅशनल कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर (इंटर- सीएचएफ)द्वारे करण्यात आला. या अभ्यासाचे उद्दिष्ट भारत, चीन, दक्षिण अमेरिकेसह सहा देशांमध्ये एका वर्षात हार्ट फेल्युअरमुळे होणारा मृत्यूदर मोजण्याचे होते.

जगभरात तब्बल २६ दशलक्ष लोक या आजारामुळे प्रभावित असून यापैकी भारतात हार्ट फेल्युअरचे जवळपास १० दशलक्ष लोक आहेत. लोक याला हार्ट अटॅक आल्यानंतरची समस्या समजून गोंधळून जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आजाराविषयी जागरुकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
तर मग जाणून घेऊया हार्ट फेल्युअर बाबत सविस्तर:-

- Advertisement -

हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅकमधील फरक

सर्वप्रथम हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की, हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यामध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व ऑक्सिजन मिळू शकत नाही, ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. तर हार्ट फेल्युअरमध्ये हृदय योग्यरित्या पंप करू शकत नाही. यामुळे संपूर्ण शरीरात रक्त पोहोचू शकत नाही. या स्थितीत, रुग्णाला श्वास घेण्यामध्ये समस्या येऊ लागते. त्याच्या पायांना सूज येऊ शकते आणि यामुळे रुग्णाच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हृदय हळूहळू काम बंद करतं आणि सरते शेवटी अचानकच पूर्णपणे धडधडणे थांबवतं. हृदयाच्या या हळूहळू काम बंद करण्याच्या प्रक्रियेला हार्ट फेल्युअर म्हणतात.

हार्ट फेल्युअरसंदर्भात सर्वात चिंता करण्याजोगी बाब ही आहे की, या स्थितीमध्ये रुग्णाला हृदयाची कोणतीही वेदना जाणवत नाही आणि अचानक दुखू लागून मृत्यू ओढवला आहे असेही घडत नाही. तर हार्ट अटॅकमध्ये रुग्णाला अचानक छातीत दुखू लागते आणि त्याचवेळी उपचार केला नाही तर त्याचा मृत्यू देखील ओढवू शकतो.

- Advertisement -

हार्ट फेल्युअरची लक्षणे

*श्वास घेण्यास त्रास
*पाय किंवा घोट्यांवर सूज
*थकवा किंवा कमजोरी जाणवणे
*रात्री पुन्हा-पुन्हा लघवी करण्याची जाणीव होणे
*धाप लागणे किंवा श्वास घेण्यामध्ये त्रास झाल्याने व्यायाम करता न येणे
*भूक न लागणे किंवा मळमळणे
*अचानक वजन वाढणे
*एकाग्रता कमी होणे

हार्ट फेल्युअरपासून वाचण्यासाठी यामागील कारणांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे तणाव. कारण तणावामुळेच बरेच आजार, जसे की मधुमेह, वजन वाढणे, उच्च रक्तदाब उद्भवू शकतात. पण भारतात लोक तणावासारख्या समस्यांवर जास्त लक्ष देत नाहीत, यामुळेच त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त होऊ शकतो.

तणाव वाढवू शकतो हार्ट फेल्युअरची रिस्क

तणाव शरीरामध्ये केमिकल प्रतिक्रिया करतो, ज्यामुळे एडरेनालाइल आणि इतर हार्मोन हृदयाची गती व श्वास घेण्याची गती वाढवते. त्यामुळे ब्लड शुगरचा स्तर वाढतो आणि या प्रतिक्रियेला पूर्ण करण्याकरिता हृदय जलदतेने पंप करावे लागते, जेणेकरून जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीराला दिला जाऊ शकेल. जर ही प्रतिक्रिया दररोज सतत होत राहिली, तर हृदयाकरिता सतत या जलदतेने पंप करणे कठीण होऊन जाते आणि ऑक्सिजन योग्यरित्या शरीरामध्ये पोहोचू शकत नाही.

लक्षणे वेळेवर ओळखा

हार्ट फेल्युअर ओळखणे जास्त कठीण नाही. याची ओळख मेडिकल हिस्ट्री तपासत, लक्षणे ओळखून, शारीरिक तपासणी, रिस्क फॅक्टर यांसारख्या उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी आजार किंवा डायबेटिस होणे व लॅबोरेटरी टेस्टने करता येऊ शकते. इकोकार्डियोग्राम, छातीचा एक्स-रे, कार्डियक स्ट्रेस टेस्ट, हार्ट कॅथेटरायझेशन व एमआरआयने ही समस्या ओळखता येऊ शकते.

उपचार महत्त्वाचे

सर्वात महत्त्वाचे हे जाणून घेणे आवश्यक आहे की, हृदयाच्या कमजोर मांसपेशींना पुन्हा बरे करता येऊ शकत नाही, म्हणूनच औषधे व थेरपींनी हे नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
हा आजार नियंत्रित करण्याकरिता जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याबरोबरच
ब-याच थेरपी जसे की, बीटा ब्लॉकर, एसीई इनहिबिटर सारखी औषधे, हाय बीपी किंवा डायबेटिससारख्या आजारांवर उपचार करुन मॅनेज करता येते.

जीवनशैलीमध्ये करा बदल

ज्या लोकांना हार्ट फेल्युअरची समस्या आहे, त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल केले पाहिजेत, जेणेकरुन या समस्येला नियंत्रित करता येऊ शकेल.

*खाण्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी करावे
*वजनावर नियंत्रण ठेवावे
*फिजिशीयनने सुचवलेलाच व्यायाम करावा
*डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत
*वेगळी लक्षणे जाणवली तर डॉक्टरांना सांगावे
*मद्यपान व धूम्रपान करू नये
*वजन किंवा सूज कमी करण्याकरिता लोकांनी सांगितलेली कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.

– डॉ. देव पहलाजानी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -