घरलाईफस्टाईलसणासुदीला बनवा गोड गुलाबाचे चिरोटे

सणासुदीला बनवा गोड गुलाबाचे चिरोटे

Subscribe

महाराष्ट्रामध्ये सणासुदीला उपवासाचे पदार्थ खातो. यासाठी गुलाबाचे चिरोटे हा गोड पदार्थ तुम्ही नाष्टाला म्हणजेच चहा आणि दुधासोबतही खाऊ शकतो. यासाठी चला जाणून घेऊया गुलाबाचे चिरोटे कसे बनवायचे.

गुलाबाचे चिरोटे

साहित्य

- Advertisement -

पाव वाटी तूप
3 वाटी मैदा
अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा बेकींग पावडर आणि लाल रंग
कॉर्नफ्लोअर 2 टेबल चमचा
अर्धी वाटी डालडा

कृती

  • मैदा, बेकींग पावडर, तूप, मीठ घालून मिश्रण एकत्र करून घेणे.
  • मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर त्यात थोडा लाल रंग मिक्स करणे.
  • तसेच दुधाने पीठ पूर्ण भिजवून घेणे.
  • तूप फेसून त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून साठा तयार करावा.
  • नंतर त्या पीठाच्या पातळ पोळ्या लाटून घ्या. अशा 9 पोळ्या लाटा.
  • त्या पोळीवर साठा पसरवा आणि त्याची गुडांळी करा.
  • दुसऱ्या पोळीवर साठा घालून त्याच्या कडेला पहिली गुडांळी ठेवून दुसऱ्या पोळीची गुंडाळी करावी.
  • मग तिसऱ्या पोळीवर पुन्हा साठा लावावा आणि पहिली गुडांळी त्यावर ठेवून त्याची परत गुंडाळी करावी.
  • अशाप्रकारे बाकीच्या पोळ्याचे गुंडाळी करून घ्या.
  • त्यानंतर त्यांना ओल्या कपड्याखाली झाकून थोड्या वेळाने 1 इंच जाडीचे तुकडे करून घ्या.
  • कापलेल्या बाजूवर अलगद हाताने चिरोटे लाटून घ्या.
  • कढईतील तूप तापल्यावर त्यामध्ये एक एक चिरोटे घाला आणि कढईत टाकल्यानंतर जरा खाली दाबावा.
  • विणायची सुई घेऊन पाकळ्या उघडा आणि तूप उडवून तळून घ्या.
  • तळून झाल्यावर अगदी गुलाबासारखे दिसतात.
  • सर्व गुलाबाचे चिरोटे तळून घ्या. मग साखरेचा पाक बनवून घ्या. तो थोडा चिरोट्यावर घाला.
  • सजावटीसाठी त्यावर बदाम पिस्त्याचे तुकडे करून घालावे. चिरोटे गरम असतील तेव्हा घालावे, त्यामुळे चिकटतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -