घरताज्या घडामोडीप्रोटीनयुक्त सोयाबीन मटर पुलाव

प्रोटीनयुक्त सोयाबीन मटर पुलाव

Subscribe

आतापर्यंत आपण मटर पुलाव, व्हेज पुलाव, पनीर पुलाव खाल्ला असेल. पण आम्ही तुम्हाला प्रोटीनयुक्त सोयाबीन पुलाव कसा बनवावा याची रेसिपी सांगणार आहोत. साधारणतः सोयाबीन हे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. पण यातील मुबलक प्रोटीनच्या गुणधर्मामुळे सोयाबीन आता सर्वच जण खातात. सोयाबीनच्या बी पासून तेल काढले जाते. त्यानंतर त्याचा जो चोथा उरतो त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याला वेगवेगळा आकार दिला जातो. नंतर बाजारात हेच सोयाचंक, सोयाबीन म्हणून विकले जाते. मासे, अंडी, चिकन, मटन यात जसे भरपूर प्रोटीन असतात तसेच सोयाबीनमध्येही असतात. यामुळे प्रोटीनसाठी शाकाहारात सोयाबीनला विशेष महत्व आहे. पुलावाबरोबरच सोयाबीनची भाजीही बनवतात.

साहित्य

- Advertisement -

एक वाटी सोयाबीन, पाव वाटी दही, दोन वाटी बासमती तांदूळ, अर्धी वाटी मटर, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, एक चमचा कोथिंबीर-पुदीना पेस्ट, मोठा चमचा अमूल बटर, दिड चमचा हळद, दोन चमचे गरम मसाला पावडर, दोन तेजपत्ता,चार लवंगा, चार काळीमिरी, एक दालचिनीची काठी, चवीपुरते मीठ

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम कुकरमध्ये दही टाकलेला भात शिजवून घ्यावा, भात मोकळा होण्यासाठी शिजवतानाच त्यात एक चमचा तेल टाकावे. त्यानंतर शिजलेला भात परातीत मोकळा करून ठेवावा. तसेच पाच मिनिट सोयाबीन पाण्यात भिजवून घ्यावे. हाताने घट्ट पिळून त्यातील पाणी काढून टाकावे. दुसरीकडे एका पसरट भांड्यात बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता, अख्खा गरम मसाला एकएक करत परतावा. नंतर त्यात सोयाबीन टाकावे. मग मटर टाकून परतून घ्यावे. हळद, आलं लसून पेस्ट टाकावी, त्यानंतर कोथिंबीर पुदीना पेस्ट टाकून शिजवलेला भात टाकावा. त्यावर गरम मसाला पावडर, मीठ, टाकून भात चागंला परतावा. गरमागरम सोयाबीन मटर पुलाव तयार. दही रायत्याबरोबर टेस्टी लागतो.


हेही वाचा – टोमॅटो सूप प्या, फिट राहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -