घरलाईफस्टाईलजुन्या कुर्त्याला द्या नवा 'स्टायलिश लूक'

जुन्या कुर्त्याला द्या नवा ‘स्टायलिश लूक’

Subscribe

तुमच्याकडे देखील असा कुर्ता आहे का? जो तुम्हाला फार आवडतो. पण, त्याचा मॅचिंग सलवार तुम्हाला घालणे शक्य नाही आहे. पण, काळजी करु नका आम्ही तुम्हाला काही खास प्रकार सांगणार आहोत. ज्यावर तुम्ही तो कुर्ता घालू शकता आणि तुमच्या ड्रेसला एक नवा स्टायलिश लूक देऊ शकता.

जीन्सवर घालू शकता

तुम्ही तुमचा आवडा कुर्ता जीन्सवर घालून नवा लूक देऊ शकता. त्यासोबत हाय हिल्स किंवा मॅचिंग शूज देखील घालू शकता. तसेच हातात वर्कवाली पर्स घेण्यापेक्षा तुम्ही प्लेन लेदरवाली किंवा अन्य मटीरियलची पर्स घेऊ शकता. यामुळे छान लूक दिसतो.

- Advertisement -

स्कर्टवर करु शकता मॅच

तुम्ही तुमचा कुर्ता स्कर्टवरही मॅच करु शकता. याकरता तुम्ही कुर्त्याला मॅचिंग कलर घेऊ शकता किंवा कन्ट्रास्टिंग कलर घेऊ शकता. सकर्ट आणि कुर्त्याचे मटीरियल सेम नसेल तरी त्याचा लूक छान दिसतो. मात्र, एक लक्षात ठेवा की कुर्ता लॉंग असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ड्रेस म्हणूनही घालू शकता

जर तुमचा कुर्ता लॉंग म्हणजे अँकल लेंथ एवढा असेल तर तुम्ही ड्रेस म्हणून घालू शकता. तसेच जर तुमच्या कुर्त्यावर वर्क नसेल तर वेस्टवर बेल्ट लावून त्याला स्टायलिश टच देता देईल. त्याचप्रमाणे जर कुर्त्यावर वर्क असेल तर सिंपल लॉंग ड्रेस म्हणून घालू शकता.

स्लिट स्टिच करा

तुमचा कुर्ता लॉंग असेल तर तुम्ही त्याला स्लिट स्टिच करु शकता. जर तुम्हाला ते घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही टेलर कडून करुन घ्या. जर तुम्हाला चालताना तो कुर्ता पायात अडकत असेल तर तुम्ही त्याची लेंथ कमी करु शकता.

कुर्त्याचा श्रग बनवा

तुम्ही तुमच्या कुर्त्याचे श्रगमध्ये रुपांतर करु शकता. हा श्रग तुम्ही लेहेंगा, जीन्स किंवा दुसऱ्या कुर्त्यावर देखील घालून स्टायलिश लूक देऊ शकता.


हेही वाचा – नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्याचे उपाय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -