घरलाईफस्टाईलथंडीत घ्या त्वचेची अशी काळजी

थंडीत घ्या त्वचेची अशी काळजी

Subscribe

थंडीत त्वचा अधिक कोरडी होते. मात्र या घरगुती उपायांचा वापर केल्यास थंडीत देखील तुमची त्वचा सुंदर राहण्यास मदत होईल.

थंडीत त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचेला काय लावायचे हे मात्र कळत नाही. अनेक व्यक्ती केमिकलचा वापर करतात. त्यामुळे त्वचेला हानी देखील पोहोचते. मात्र यावर घरगुती उपाय केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

  • कोरडी त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन हा पॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे कोरडेपणा कमी होतो.
  • काही व्यक्तींची ऑईली किंवा ड्राय स्किन असते. अशाव्यक्तीने मुलतानी माती, मध आणि दही यांचा वापर करुन फेसपॅक तयार करुन चेहऱ्याला लावल्याने त्वचा थंडीतही चांगली राहते.
  • लिंबाच्या रसात एरेंडेल तेल समप्रमाणत मिक्स करुन त्याचे चेहऱ्याला मालिश करुन चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा.
  • रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन लावून झोपल्यास चेहरा नितळ होतो.
  • दुधात २ बदाम भिजवून त्याची साल काढून वाटून घ्यावी आणि त्यात थोडंसं संत्र्याचा रस घालून हात, पाय आणि चेहऱ्याला लावून चेहरा सुकल्यानंतर धुऊन घ्यावा.
  • पपईचा गर चेहऱ्याला लावून चेहरा अर्ध्या तासाने धुऊन घ्यावा यामुळे त्वचा चमकदार बनते.
  • मधात लिंबाचा रस मिसळून हा पॅक चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
  • टोमॅटो, गाजर आणि काकडीचा रस सम प्रमाणात घेऊन हा पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा अधिक खुलून दिसतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -