घरलाईफस्टाईलचेहरा धुण्यासाठी फेसवॉश न वापरता 'या' गोष्टींचा करा वापर

चेहरा धुण्यासाठी फेसवॉश न वापरता ‘या’ गोष्टींचा करा वापर

Subscribe

घरच्या घरी स्वच्छ करा चेहरा

चेहरा धुण्यासाठी आपल्यापैकी बर्‍याच मुली बाजारातील केमिकल फेसवॉश वापरतात. परंतु, दररोज फेसवॉशने चेहरा धुण्याने त्वचेची चमक कमी होते आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती वस्तू सांगणार आहोत. ज्याचा फेसवॉश म्हणून तुम्ही वापर करु शकता आणि त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येण्यास मदतही होऊ शकते. चला तर जाणून घेऊया काही खास गोष्टी ज्यामुळे चेहऱ्याला चमक येण्यास मदत होईल.

दूध

- Advertisement -

दुधामुळे केवळ तुमची हाडेच मजबूत होत नाहीत तर दूध क्लिनजर म्हणूनही वापरता येते. त्यात आढळणाऱ्या लॅक्टिक acidसिडमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी दुधाचा वापर करु शकता.

काकडी

- Advertisement -

काकडीमुळे चेहऱ्याला एक वेगळीच चमक येते आणि चेहरा उजळण्यास देखील मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावर थंड काकडी ठेऊन थोड्यावेळाने चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

लिंबू

जर तुमची स्किन तेलकट असेल तर चेहरा धुण्यासाठी लिंबाच्या रसाचा तुम्ही वापर करुन शकता. लिंबू हे एक बेस्ट क्लिनजर आहे. याचा वापर करताना लिंबाच्या रसात थोडे दूध किंवा दही घालून मिश्रण एकत्र करुन चेहऱ्याला लावाले. त्यामुळे चेहरा चमकरण्यास मदत होते.

ओटमील

चेहरा धुण्यासाठी ओटमील एक रामबाण उपाय आहे. ओटमील ग्राइंड करुन त्याची पावडर तयार करावी. या तयार केलेल्या पावडरमध्ये तेल किंवा पाणी मिक्स करुन हे मिश्रण चेहऱ्याला लावावे आणि चेहरा गरम पाण्याने धुऊन घ्यावा, यामुळे चेहरा चमकण्यास देखील मदत होते.

मध

मध हे एक antioxidant आहे. हे चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला चांगले मॉइस्चराइजर होते. मध चेहऱ्याला लावून चांगले मालिश करावे आणि चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करुन घ्यावा. यामुळे चेहरा चमकण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -