घरताज्या घडामोडीImmunity Boost: रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सूप

Immunity Boost: रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सूप

Subscribe

सध्याच्या कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे फार महत्वाचे आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या आणि चिकन, मटन यांचे सूप घेणेही आवश्यक आहे. दिवसातून एकदा तरी सूप घ्यावे, त्यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच पण त्यातील आरोग्यदायी घटकांमुळे आजारी व्यक्ती किंवा आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या शरीराची झीजही भरून निघते. घरच्या घरी कमी वेळेतही हे झटपट सूप बनवता येते.

मिक्स व्हेज सूप

साहित्य 

- Advertisement -

एक वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर, अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी, अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा किसलेले आले, दोन चमचे अमूल बटर, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी पावडर चवीनुसार, मीठ चवीनुसार, दिड ग्लास पाणी.

कृती

- Advertisement -

एका पसरट पातेल्यात दोन चमचा अमूल बटर टाका. त्यानंतर त्यात सर्वप्रथम कांदा परतून घ्या. नंतर त्यात आलं टाकून परता. सर्वभाज्या एकेक एक करून परतून घ्या. नंतर पाणी आणि मीठ टाका. भाज्यांच्या मिश्रणाला चांगली उकळी आली कि त्यात कॉर्नफ्लॉवर टाका व ढवळून घ्या. झटपट व्हेज सूप तयार. गरम गरम सर्व्ह करा. बनवण्यास सोपे व शक्तीवर्धक असे हे सूप आहे.


हेही वाचा – Health Tips: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास झिंकयुक्त आहाराचे फायदे जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -