ठाणे ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला महापौरांची भेट; स्वच्छता व गुणवत्तेची केली तपासणी

या रुग्णालयात रुग्ण सेवा, औषधांसोबतच सर्व रुग्णांना मोफत नाश्ता, जेवण दिले जाते. हे काम एस अॅन्ड ए कॅटरिंग सर्व्हिस प्रा .लि. या कंत्राटदार कंपनीला दिले असून त्यांच्या किचनला बुधवारी महापौरांनी अचानक भेट दिली

Mayor visits Thane Global Hospital kitchen; Hygiene and quality inspection
ठाणे ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला महापौरांची भेट; स्वच्छता व गुणवत्तेची केली तपासणी

ठाणे महापालिकेचे सर्वात महत्त्वाचे कोरोना रुग्णांना जीवदान देणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला बुधवारी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी अचानक भेट देऊन तेथील स्वच्छता व अन्नाचा दर्जा, गुणवत्ता व योग्यतेची पाहणी केली. कोरोना काळात ठाणे महापालिकेने उभ्या केलेल्या ग्लोबल हाँस्पिटल मुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही खाजगी मोठ्या रुग्णालयाप्रमाणे अद्ययावत सेवा या रुग्णालयात महापालिका मोफत उपलब्ध करुन देत आहे. चांगले डाँक्टर, सोबत सर्व कर्मचारी, स्वच्छता, अत्याधुनिक यंत्रणा या सर्व आघाडीवर हे रूग्णालय रुग्ण सेवेत अव्वल ठरले आहे. खाजगी रूग्णालयात कोविड उपचारासाठी लाखो रूपये खर्च होत असताना ठाणे ग्लोबल कोविड रूग्णालयात रुग्ण मोफत उपचार घेवून बरे होत आहेत, त्यामुळे त्याची गुणवत्ता कायम रहावी यासाठी महापालिका लक्ष देवून काम करत आहे.

या रुग्णालयात रुग्ण सेवा, औषधांसोबतच सर्व रुग्णांना मोफत नाश्ता, जेवण दिले जाते. हे काम एस अॅन्ड ए कॅटरिंग सर्व्हिस प्रा .लि. या कंत्राटदार कंपनीला दिले असून त्यांच्या किचनला बुधवारी महापौरांनी अचानक भेट दिली. यावेळी भाजपा नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हेही सोबत होते. किचन मधील स्वच्छता आणि जेवण बनविण्याची पध्दत , आरोग्याच्या दृष्टीने योग्य असे जेवण त्याची गुणवत्ता. जेवणासाठी वापलेल्या पदार्थ, तेल, भाज्या, फळे यांची स्वच्छता व गुणवत्ता तसेच पँकिंग, गोडावून या सर्व बाबींची महापौरांनी पाहणी केली व त्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. योग्य अशी अत्याधुनिक यंत्रणा आणि साफसफाई युक्त कीचन आणि त्यांची कार्यपध्दती पाहून आणि मराठी तरुणाची यातली इन्व्हॉलमेंट पाहून समाधान वाटले, असे महापौरांनी यावेळी नमूद केले.