घरलाईफस्टाईलतुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता?

तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता?

Subscribe

तुम्हीही जाणून घ्या कोणत्या पोझिशनमध्ये झोपल्यास या समस्या टाळता येतात.

बऱ्याचदा आपण झोपताना कसे झोपतो हे आपल्यालाही माहित नसते. मात्र, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी, कंबरदुखी आणि मानेचा त्रास होण्यास सुरुवात होते. परंतु, त्याचे कारण काही कळत नाही. मात्र, या समस्येमागचे कारण म्हणजे झोपण्याची पोझिशन असते. जर आपण झोपण्याची योग्य पोझिशन ट्राय केली आणि चुकीची पोझिशन टाळली तर या समस्या तुम्ही नक्की टाळू शकता.

डाव्या कुशीवर झोपणे

- Advertisement -

बऱ्याचदा डॉक्टर देखील सांगतात की डाव्या कुशीवर झोपणे केव्हाही चांगले. कारण ही सर्वात योग्य पोझिशन मानली जाते. यामुळे Acidity आणि बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. त्यासोबतच मान आणि पाठदुखी दूर होते.

पाठीवर झोपणे

- Advertisement -

पाठीवर झोपणे ही एक उत्तम पोझिशन मानली जाते. या पोझिशनमध्ये डोके, मान आणि मणके सरळ राहण्यास मदत होते. तसेच मानेच्या वेदना आणि बॅक पेनच्या समस्या दूर होतात.

गुडघे पोटाजवळ घेऊन झोपणे

बरेच जण एका कुशीवर झोपून पाय पोटाजवळ घेऊन झोपतात. याचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे मान – पाठदुखी उद्धभवते.

हात-पाय पसरवून झोपा

हात-पाय पसरवून झोपण्याची पद्धत एक उत्तम आहे. त्यासोबतच हात मानेखाली घेऊन झोपा. यामुळे सुरकूत्या, स्ट्रेस आणि मसल्स पेन दूर होण्यास मदत होते.

पोटावर झोपणे टाळा

पोटावर झोपण्याची पद्धत फार चुकीची आहे. कारण पोटावर झोपल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी आणि मानेचा त्रास होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -