घरलाईफस्टाईलinternational kissing day- किस केल्याने होऊ शकतो 'या' आजारांचा संसर्ग

international kissing day- किस केल्याने होऊ शकतो ‘या’ आजारांचा संसर्ग

Subscribe

सेक्शुअल ट्रांसमिटेड इंन्फेक्शनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जगभरात आज 6 जुलै रोजी इंटरनॅशनल किसिंग डे (international kissing day)साजरा करण्यात येतो. या दिवासानिमित्त प्रत्येक जोडप्याला प्रेम दर्शवण्याचे तसेच प्रेम प्रकट करण्याची संधी मिळते. किस करणे हा  प्रेम जाहीर करण्याचा मार्ग असला तरी याने सेक्शुअल ट्रांसमिटेड इंन्फेक्शन (STIs) होण्याचा धोका होऊ शकतो हे तुम्हांला माहितीये का? आज आपण किस करताना कोणती खबरदारी बाळगायला हवी तसेच सेक्शुअल ट्रांसमिटेड इंन्फेक्शनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

हर्पीस-

हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरसने होणारा एक संक्रमण आजार आहे. हा आजार एक दुसऱ्याच्या संपर्कात आल्याने त्वचेमार्फत वेगाने पसरतो. तसेच याचे संक्रमण दोन प्रकारे पसरते. HSV-1 याला ओरल हर्पीस बोलण्यात येते. होरल हर्पीस किस केल्याने पसरतो. तसेच याचा दुसरा प्रकार HSV-2 आहे याला जेनिटल हर्पीस बोलण्यात येते. या प्रकारचा हर्पीस शारीरिक संबंधातून पसरतो तसेच किस केल्याने सुद्धा याचा फैलाव होऊ शकतो. या आजारापासून वाचण्यासाठी डॉक्टर अँन्टीव्हायरल ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला देताता

- Advertisement -
साइटोमेगालो व्हायरस-

साइटोमेगालो व्हायरस(CMV) एक व्हायरल संक्रमण आहे. आणि हा आजार तोंडातील लाळेने पसरतो. तसेच हा आजार सीमन,ब्रेस्ट,रक्तामार्फत पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याला सेक्शुअली इंफेक्‌शन माणले जाते कारण याचा प्रसार ओरल तसेच महिला व पुरूषांच्या गुप्त भागाच्या संपर्कात आल्याने होतो. हा आजार रोखण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ला घेऊन औषधोपचार करु शकतात. तसेच हर्पिसमध्ये दिली जाणारी ट्रिटमेंटने सुद्धा हा रोग आटोक्यात येऊ शकतो.

सिफलिस-

सिफलिस एका प्रकारचा बॅक्टेरिअल इंन्फेक्शन आहे. आणि हे इंन्फेक्शन किस केल्याने पसरते. साधारणत: ओरल किंवा जेनिटल सेक्सच्या माध्यमातून सिफलिस वाढू शकतो. किस केल्याने बॅक्टेरिया एकमेकांच्या तोंडात पसरतो. तसेच वेळीस सिफलिसवर उपचार न केल्यास हा आजार गंभीर रुप धारण करु शकतो

- Advertisement -
आपल्या पार्टनर सोबत कसा साधणार संवाद

सेक्शुअल ट्रांसमिटेड इन्फेक्शन हा असा विषय आहे यावर लोक मोकळेपणाने संवाद साधण्यास पुढे सरसावत नाहीत. जर तुमच्या मनात STIs बाबत कोणतीही भीती असेल तर तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधा. तुम्हांला असे जाणवत असेल कि तुमच्या जोडीदारा सोबत शारीरिक संबध ठेवण्याकरीता काही नियम व सीमा आखायला हव्यात तर याबाबत चर्चा करणे गरजेचं आहे. आपल्या भावना नेहमीच खऱ्या आणि मोकळेपणाने मांडल्या गेल्या तर आजार होण्याचा धोका टळू शकतो.



हे हि वाचा – कामाच्या अधिक तासांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, WHO चा इशारा



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -