घरलाईफस्टाईलतुम्ही वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरताय का?

तुम्ही वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरताय का?

Subscribe

तरूणींकडून साध्या मेकअप ऐवजी वॉटरप्रूफ मेकअप करण्याला अधिक पसंती दिसते

सध्या धावपळीची जीवनशैली असली तरी, सर्वांनाच नीटनीटके राहायला आवडते. मग त्यात पुरूष वर्ग असो किंवा महिला वर्ग. पुर्वी काही सण समारंभ असला तरच मेकअप केला जायचा. परंतु आता रोजच महिला किंवा तरूण मुली सर्रास मेकअप करून ऑफिस तसेच महाविद्यालयात जातांना दिसतात. उन्हाळा किंवा पावसाळ्यात हा केलेला मेकअप खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी तरूणींकडून साध्या मेकअप ऐवजी वॉटरप्रूफ मेकअप करण्याला अधिक पसंती दिसते. उन्हाळ्यातील येणाऱ्या घामात आणि सुरू होणाऱ्या पावसात हा मेकअप जसाच तसा रहावा असे प्रत्येकीलाच वाटत असते. परंतु, वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरणे हे सुरक्षित आहे की नाही? हे माहित आहे का?

- Advertisement -

वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने सुरक्षित आहे का?

मेक-अप केल्यावर त्वचेतील घाम अथवा तेलामुळे तो खराब होऊ नये, यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप मध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. वॉटरप्रुफ मेक-अप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरण्यात येतात ते घटक जर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते. पण काही वेळा असे वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरणे सुरक्षित असू शकत नाही.

असा काढा वॉटरप्रूफ मेकअप

  • चेह-यावरील जाड थर असणारे वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घेऊन काढा.
  • यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावून थोड्यावेळ ते तेल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.
  • चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे कोल्ड क्रीम वापरणे फायदेशीर ठरेल.
  • वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापर करणे उत्तम ठरते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -