घरलाईफस्टाईलउच्च रक्तदाब ठेवा नियंत्रणात

उच्च रक्तदाब ठेवा नियंत्रणात

Subscribe

धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. कोणत्याही आजारात आहाराची पथ्ये सांभाळणे हे त्यांच्या औषधे घेण्या इतकेच महत्त्वाचे आहे. तसेच उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर दुष्परिणाम होऊ शकतात. उच्च रक्तदाब असणार्‍यांना आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करायला नको. यात आहाराचे काही नियम पाळल्यास आजारावर ताबा ठेवता येईल.

आहारात फळं, भाज्या, लसूण, कांदा, सोयाबीन यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असावा.

- Advertisement -

मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, पपई, सफरचंद, संत्र, जाम, अननस या फळांचे सेवन करावे.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात मिठाचा वापर टाळावा. तसेच चहा आणि कॉफी घेणे कमी करावे. कारण यातील कॅफीन हानीकारक असतं.

- Advertisement -

जेवण बनविण्यासाठी सोयाबीन तेल वापरावे.

आहारात बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा समावेश करावा. तसेच पालेभाज्यांसह भोपळा, दुधी भोपळा, रिज भोपळा, आणि टिंडे या भाज्या खायला हव्या. लिंबू आणि पुदिन्याचे नियमित रूपाने सेवन केले पाहिजे.

दिवसातून कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. तसेच उच्च रक्तदाबाचे रुग्ण ताक आणि साय काढलेलं दूध घेऊ शकता.

बदाम, मनुका, ओवा आणि आलं यांचे सेवन लाभदायक ठरेल. याशिवाय अंड्यातील बलक हा रक्तदाबावर गुणकारी ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -