घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील टीप्स

स्वयंपाक घरातील टीप्स

Subscribe

झटपट ‘किचन टीप्स’

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
  • पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा. पुर्या खुसखुशीत बनतील.
  • मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
  • डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.
  • दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
  • हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढते.
  • डाळिंबीची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंब आख्य राहते. तसेच डाळिंब शिजाण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर ते चांगले लागत नाही.
  • सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
  • साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिरकाव करावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
  • वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद आणि चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते आणि स्वादही छान येतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -